Virat Kohli Unblock Rahul Vaidya Singer Call Good Human Being To Cricketer Earlier Lashed Out Him
IPL २०२५ : भारतात आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम सुरू आहे. आतापर्यंत ५५ सामने खेळवण्यात आले आहेत. सर्व खेळाडू आयपीएल खेळण्यात व्यस्त आहेत. अशातच बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल वैद्य सध्या चर्चेत आला आहे. त्याचे कारणही जरा वेगळे आहे. तो भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीवर सतत वादग्रस्त टीका टिप्पण्या करताना दिसून येत असतो. एवढेच नाही तर त्याने आता त्याच्या चाहत्यांना देखील शिवीगाळ करायला सुरुवात केली आहे. ज्यामुळे त्याला आता खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
विराट कोहली सध्या अल्गोरिथम सिद्धांताबाबत चर्चेत आला आहे. त्याच्या इंस्टाग्रामवरून टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरच्या फोटोला लाईक पाठवण्यात आले होते. त्यानंतर लोकांनी अनेक प्रकारच्या कमेंट करायला सुरवात केली आहे. पण नंतर कोहलीने याबाबत स्पष्टीकरण देत सांगितले की अल्गोरिथममुळे फोटो लाईक झाला होता. राहुल वैद्यकडून देखील या प्रकरणावर टीका करण्यात आली होती.
हेही वाचा : IPL 2025 : पहिल्या सामन्यात ८९ धावा तर पुढील ६ डावात..,आयपीएलमध्ये Karun Nair ची आगळीवेगळी कामगिरी..
विराट कोहलीकडून राहुल वैद्य यांना इंस्टाग्रामवरून ब्लॉक करण्यात आले आहे. त्यावर राहुलने एक व्हिडिओ बनवून म्हटले की ‘विराट कोहलीने कदाचित त्याला ब्लॉक केले नसेल, इंस्टाग्रामच्या अल्गोरिथमने कदाचित म्हटले असेल की विराट कोहली, मी तुमच्या वतीने राहुल वैद्य यांना ब्लॉक करत आहे.’ हा व्हिडिओ व्हायरल होताच कोहलीच्या चाहत्यांनी राहुल वैद्य यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यानंतर राहुलने आता कोहलीच्या चाहत्यांना देखील विनोदी म्हटले आहे.
Singer Rahul vaidya instagram story 😭😭 pic.twitter.com/6fFFBJzT9d
— 𝐒𝐡𝐫𝐞𝐲𝐚𝐬𝐌𝐒𝐃𝐢𝐚𝐧™ (@Itzshreyas07) May 5, 2025
अत्यंत वाईटपद्धतीने ट्रोल झाल्यानंतर, राहुल वैद्य याचा राग विराट कोहली तसेच त्याच्या चाहत्यांवर देखील निघाला आणि तो भडकला. त्याने इंस्टाग्रामवर दोन स्टोरीज शेयर केल्या आहेत. पहिल्या स्टोरीमध्ये लिहिलेया आहे की, ‘विराट कोहलीचे चाहते त्याच्यापेक्षा देखील मोठे विनोदी आहेत.’ याचा अर्थ असा की तो कोहलीला जोकर म्हणत असल्याचे दिसत आहे.
तर दुसऱ्या स्टोरीवर त्याने लिहिले की, – ‘तुम्ही मला शिवीगाळ करत आहात, ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही माझ्या बहिणीला, माझ्या पत्नीला शिवीगाळ करत आहात, ज्यांचा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही, हे योग्य नाही. म्हणूनच मी म्हणतोय की विराट कोहलीचे चाहते विनोदी आहेत. दोन पैशांचे जोकर.”
Update : Kohli fans started abusing his family pic.twitter.com/EC5mEGQ7TB
— 𝐒𝐡𝐫𝐞𝐲𝐚𝐬𝐌𝐒𝐃𝐢𝐚𝐧™ (@Itzshreyas07) May 5, 2025
राहुलची ही स्टोरी व्हायरल झाल्यापासून त्याला जास्त ट्रोल करण्यात येऊ लागले आहे. कारण कोहलीचे चाहते जगभर असून ते कोणालाही माहिती नाही. राहुल वैद्य याने कोहलीवर टीका केली आणि आता चाहत्यांना विनोदी देखील म्हटले, हे त्यांच्या चाहत्यांना अजिबात रुचलेले नाही. त्यांच्या या विधानानंतर, राहुल आता मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.