गुजरात टायटन्स टीम(फोटो-सोशल मीडिया)
MI vs GT : आयपीएल २०२५ मध्येआतापर्यंत ५५सामने खेळवण्यात आले असून आज ५६ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. या संन्यापूर्वीच गुजरात संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आता हंगामातील उर्वरित सामन्यांमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. बंदी घातलेल्या औषधांच्या वापरासाठी रबाडावर एक महिन्याची तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ज्याची शिक्षा पूर्ण झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या या स्टार वेगवान गोलंदाजाने आपली चूक कबूल केली होती. त्यानंतर त्याला एक महिना क्रिकेटपासून दूर राहावे लागले. आता तो मैदानात परतण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. आता तो गुजरात टायटन्सच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो. त्यानंतर आता गुजरात टायटन्सने अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, रबाडा आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि संघ निवडीसाठी उपलब्ध देखील आहे.
गुजरात संघाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, कागिसो रबाडाने आपली चूक मान्य केली आहे आणि त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या अँटी-डोपिंग एजन्सीने याबाबत चौकशी पूर्ण केली आहे. रबाडाने निलंबनाची शिक्षा भोगली असून तो पुनर्वसन कार्यक्रमही पूर्ण करून आला आहे. आता तो निवडीसाठी पूर्णपणे उपलब्ध आहे.
हेही वाचा : IPL 2025 : पहिल्या सामन्यात ८९ धावा तर पुढील ६ डावात..,आयपीएलमध्ये Karun Nair ची आगळीवेगळी कामगिरी..
हंगामातील पहिले दोन सामने खेळल्यानंतर लगेच रबाडाने गुजरात टायटन्स संघ सोडला आणि तो दक्षिण आफ्रिकेला निघून गेला. त्यावेळी, फ्रँचायझीकडून वैयक्तिक कारणे सांगण्यात आली होती.परंतु, रबाडाने नंतर एक निवेदन जारी करून मान्य केले होते की, त्याने हंगाम सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत बंदी घातलेला पदार्थ वापरला होता. आता रबाडाच्या पुनरागमनावर, गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.
विक्रम सोलंकी यांनी कागिसोबद्दल बोलताना सांगितले की, ‘मी दोन गोष्टी स्पष्ट सांगू इच्छितो. प्रथम, त्याने आपली चूक मान्य केली आहे आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मी त्यांचे विधान वाचले असून त्यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची परिपक्वता दिसून येते. तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरून खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्याने या अनुभवातून एक धडा घेतला आहे आणि तो आमच्या गटाचा भाग म्हणून परत आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. ड्रग्जचा वापर केल्यामुळे या खेळाडूवर आयपीएल २०२५ मधून बंदी घालण्यात आली होती.
हेही वाचा : IPL २०२५ : ‘विराट जोकर तर त्याचे चाहते दोन पैशांचे…’, Rahul Vaidya ने किंग कोहलीवर पुन्हा केली आगपाखड..
दुसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकरणात सर्व प्रक्रिया आणि प्रोटोकॉल पूर्णपणे पाळण्यात आले आहेत. कागिसो, त्यांचे प्रतिनिधी आणि सर्व संबंधित पक्षांनी नियमांनुसार प्रत्येक पाऊल टाकले आहे. आम्ही त्यांच्या भावनांची देखील पूर्ण काळजी घेतली आहे. राबडाने आता त्याची ३० दिवसांची निलंबनाची मुदत देखील पूर्ण केली आहे.