Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs PBKS : मुंबईच्या मिस्टर ३६० चा IPL मध्ये धुमाकूळ!  Sachin Tendulkar चा १५ वर्ष जुना महारेकॉर्ड केला खालसा! वाचा सविस्तर.. 

आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडीयन्सचा पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकून एक विक्रम रचला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 27, 2025 | 10:16 AM
MI vs PBKS: Mumbai's Mr. 360 makes a splash in IPL! Khalsa breaks Sachin Tendulkar's 15-year-old record! Read in detail..

MI vs PBKS: Mumbai's Mr. 360 makes a splash in IPL! Khalsa breaks Sachin Tendulkar's 15-year-old record! Read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

MI vs PBKS : आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडीयन्सचा पराभव केला. या सामन्यातआधी पंजाबने टॉस जिंकून प्रथम  गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्स गमावून  20 ओवर मध्ये १८४ धावा केल्या होत्या. पंजाबने हे आव्हान १९ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करून सहज विजय मिळवला. जरी या सामन्यात मुंबईला विजय मिळवता आला नसला तरी मुंबईच्या मिस्टर ३६० म्हणजेच सूर्यकुमार यादवने अनेक विक्रम रचले आहेत. पंजाब किंग्जविरुद्ध २५ धावा करताच तो एका हंगामात सर्वाधिक २५ किंवा त्याहून अधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्यानंतर त्याने ३६ पेक्षा जास्त धावा करून सचिन तेंडुलकरचा १५ वर्षांचा जुना विक्रम देखील मोडीत काढला आहे.

सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससाठी एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा १५ वर्षे जुना विक्रम मोडून एक नवीन विक्रम रचला आहे. आयपीएल २०२५ च्या हंगामात ६१९ धावा करून सूर्यकुमार यादवने सचिन तेंडुलकरचा  ६१८ धावांचा महारेकॉर्ड मागे टाकला आहे.

हेही वाचा : Liverpool heartbreaking scene! विजयी परेडमध्ये माथेफिरू कार चालकाचा धुमाकूळ! फुटबॉल चाहत्यांना चिरडले, पहा व्हिडिओ

आयपीएलच्या एका हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा

  • सूर्यकुमार यादव (2025) – 619* 
  • सचिन तेंडुलकर (२०१०) -६१८ 
  • सूर्यकुमार यादव (२०२३) – ६०५ 
  • सचिन तेंडुलकर (२०११) – ५५३  
  • लेंडल सिमन्स (२०१५) – ५४०
  • रोहित शर्मा (२०१३) – ५३८ 

सूर्यकुमार यादवने एमआयसाठी एकापेक्षा जास्त वेळा ६००+ धावा..

सूर्यकुमार यादवने या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी ६०० धावा केल्या आहेत. त्याने एकाहून अधिक हंगामात ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. असे करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. २०२३ मध्ये त्याने ६०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर आता या हंगामात त्याने ६३० पेक्षा जास्त धावांचा टप्पा पार केला आहे.

पंजाबविरुद्ध सूर्याचे तडाखेबंद अर्धशतक

आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात सूर्यकुमार यादवने ३९ चेंडूत खणखणीत  ५७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार खेचले आहेत. त्याच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सला १८० चा आकडा पार करता आला आहे.

हेही वाचा : IPL 2025 : ‘पण BCCI ने त्याला कोणताही आदर..’ महिला क्रिकेटपटूचे बोर्डावर गंभीर ताशेरे, वाचा प्रकरण काय?

सामन्याची स्थिति..

आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करत मुंबई इंडियन्सने ७ विकेट्स गमावून १८४ धावा उभारल्या. मुंबईकडून रायन रिकेल्टनने २७, रोहित शर्माने २४ केल्या तसेच एका टोकाला धरून राहिलेल्या सूर्यकुमार यादवने ५७ धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंगने, मार्को जानसेनसह विजय कुमार व्यास यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या आहेत. प्रतिउत्तरात प्रियांश आर्या आणि जोश इंग्लिश यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाबने हे आव्हान १९ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करून सहज विजय मिळवला.

Web Title: Mi vs pbks mumbais suryakumar yadav makes a splash in ipl sachin tendulkars 15 year old record broken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 10:16 AM

Topics:  

  • IPL 2025
  • IPL records
  • MI vs PBKS
  • Sachin Tendulkar
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Ind vs WI 2nd Test :  यशस्वी जयस्वालचा दिल्लीत बोलबाला! डॉन ब्रॅडमनसह ‘या’ भारतीय दिग्गजाच्या यादीत झाला  सामील 
1

Ind vs WI 2nd Test :  यशस्वी जयस्वालचा दिल्लीत बोलबाला! डॉन ब्रॅडमनसह ‘या’ भारतीय दिग्गजाच्या यादीत झाला  सामील 

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
2

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…
3

IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…

IND vs SL : हरमनप्रीतच्या संघावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास! म्हणाला – भारतातील महिला क्रिकेट एका महत्त्वपूर्ण…
4

IND vs SL : हरमनप्रीतच्या संघावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास! म्हणाला – भारतातील महिला क्रिकेट एका महत्त्वपूर्ण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.