
मुंबई इंडियन्सला हरवून RCB ने उघडले खाते (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मुंबई इंडियन्सने केल्या केवळ १५४ धावा
WPL मधील पहिल्याच सामान्यात सजीवना सजनाच्या धमाकेदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ बाद १५४ धावा केल्या. लॉरेन बेलने आरसीबीसाठी चांगली सुरुवात केली. आरसीबीच्या चुरशीच्या गोलंदाजीमुळे, मुंबई ११ षटकांत ४ गडी गमावून फक्त ६७ धावा करू शकली. परंतु त्यानंतर निकोला केरी आणि सजीवन सजनाने एका टोकावरून फटकेबाजी केली. सजीवन सजनाने २५ चेंडूत ४५ धावा केल्या, तर निकोलाने २९ चेंडूत ४० धावा केल्या.
या दोन डावांमुळे मुंबईला त्यांचे रक्षण करता येईल असे लक्ष्य गाठता आले. बंगळुरूकडून लॉरेल बेलने चांगली गोलंदाजी केली, ४ षटकात १ मेडन टाकले आणि १४ धावांत १ बळी घेतला. सजनाला ४ धावांवर जीवदान मिळाले आणि आता ती त्याचा फायदा घेत आहे. तत्पूर्वी, आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकली आणि मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नाणेफेक १५ मिनिटे आधीच झाली. त्यानंतर उद्घाटन समारंभ झाला, जिथे हरनाज, जॅकलिन आणि हनी सिंग यांनी त्यांच्या कामगिरीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.
डी क्लर्कने खेचली मॅच
आरसीबीला विजयासाठी शेवटच्या षटकात १८ धावांची आवश्यकता होती. सर्वांच्या नजरा आणि आशा डी क्लार्कवर होत्या. हरमनप्रीत कौरने शेवटच्या षटकाची जबाबदारी नॅट सायव्हर ब्रंटकडे सोपवली. पहिले दोन चेंडू डॉट बॉल होते, ज्यामुळे मुंबईच्या बाजूने तोल गेला, परंतु नंतर डी क्लार्कने सलग चार चेंडूत दोन षटकार आणि दोन चौकार मारून सामना आरसीबीच्या बाजूने केला. डी क्लार्कने ४४ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह ६३ धावांची नाबाद खेळी केली.
आरसीबीचा डाव डळमळीत झाला होता
आरसीबीचा धावांचा पाठलाग चांगला सुरू झाला, पण नंतर तो डळमळीत झाला. एका क्षणी आरसीबीचा अर्धा संघ ६५ धावांवर बाद झाला. त्यानंतर क्लार्कने अरुंधती रेड्डी (२०) सोबत सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला आणि विजयाचा मार्ग मोकळा केला. आरसीबीकडून सलामीवीर ग्रेस हॅरिसने २५ धावा आणि स्मृती मानधनाने १८ धावा केल्या. मुंबईकडून निकोला केरी आणि अमेलिया केर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. नॅट सायव्हर ब्रंट, शबनम इस्माइल आणि अमनजोत कौर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन: नॅट सायव्हर-ब्रंट, जी कमलिनी (यष्टीरक्षक), अमेलिया केर, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, निकोला केरी, पूनम खेमनार, शबनीम इस्माईल, संस्कृती गुप्ता, सजीवन सजना, सायका इशा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला प्लेइंग इलेव्हन: स्मृती मानधना (कर्णधार), ग्रेस हॅरिस, दयालन हेमलता, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, नादिन डी क्लर्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, प्रेमा रावत, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल