अर्जुन पुरस्कार-खेलरत्न पुरस्कार : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी अर्जुन पुरस्कार मिळवणारा 58 वा क्रिकेटपटू ठरला आहे. आज (9 जानेवारी) त्यांना हा मोठा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव केला. आज सकाळी 11 वाजल्यापासून राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली. द्रोणाचार्य पुरस्कार प्रथमच देण्यात आला. यानंतर गतवर्षी विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुरस्कारांसाठी राष्ट्रपती भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील सर्वात मोठा सन्मान, खेलरत्न पुरस्कार, बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना मिळाला आहे.
स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले. हे सर्व पुरस्कार या खेळाडूंना त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात आले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गेल्या वर्षी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 24 बळी घेतले.
33 वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज शमी सध्या दुखापतीशी झुंजत आहे. याच कारणामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळू शकला नाही. पण आता तो इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत खेळेल अशी अपेक्षा आहे.
खेलरत्न पुरस्कार
चिराग शेट्टी – बॅडमिंटन
सात्विकसाईराज रँकीरेड्डी – बॅडमिंटन
अर्जुन पुरस्कार
ओजस प्रवीण देवतळे – तिरंदाजी
अदिती गोपीचंद स्वामी – तिरंदाजी
श्रीशंकर – अॅथलेटिक्स
पारुल चौधरी – अॅथलेटिक्स
मोहम्मद हुसामुद्दीन – बॉक्सर
आर वैशाली – बुद्धिबळ
मोहम्मद शमी – क्रिकेट
अनुष अग्रवाल – घोडेस्वारी दिव्याकृती
सिंग – अश्वारूढ ड्रेसेज दीक्षा बहारू
डागर – घोडेस्वारी
कृष्णा डागर – कृष्णा
डागर – हॉकी
पवन कुमार – कबड्डी
रितू नेगी – कबड्डी
नसरीन – खो-खो
पिंकी – लॉन बॉल्स
ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर – नेमबाजी
इशा सिंग – नेमबाजी
हरिंदर पाल सिंग – स्क्वॉश अहिका
मुखर्जी – टेबल टेनिस
सुनील कुमार – कुस्ती
अल्टिमेट – कुस्ती रोशीब कुमार
शीतल देवी – पॅरा तिरंदाजी
अजय कुमार – अंध क्रिकेट
प्राची यादव – पॅरा कॅनोइंग