
भारताच्या माजी खेळाडूंची नाराजी
वेलिंगटन कसोटी सामन्यासाठी भारताने अंतिम संघात मोहम्मद सिराजला स्थान दिलेले नाही. सेहवाग, गावस्करने देखील यावरून नाराजी व्यक्त केली होती. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. आता अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानेही या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवण्यामागे नियोजनबद्ध वातावरण तयार केले गेल्याचा आरोप अश्विनने केला आहे.
IND Vs NZ: ‘त्याचे नाव सिराज म्हणून…’; कॉँग्रेस नेत्याचे ‘ते’ विधान अन् प्रकरणाला धार्मिक रंग?
मोहम्मद सिराजला बाहेर ठेवल्याने सर्वत्र आता चर्चा सुरू झाली आहे. माजी फिरकीपटू आणि खेळाडू रवीचंद्रन अश्विनने देखील यावर भाष्य केले आहे. सिराजला बाहेर ठेवण्यासाठी एक आठवडा नव्हे तर एका महिन्यापासून वातावरण तयार केले जात आहे. आधी त्याला वनडेमध्ये खेळवले गेले नाही. पुढे वनडे वर्ल्ड कप आहे आणि तुम्हाला सिराजची गरज नाही? त्याची गरज कशी नाही, हे सांगा.
वेगवान गोलंदाजी विभागातील निवडीवर भाष्य करताना अश्विनने मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहचे स्थान संघात निश्चित असल्याने त्याने स्पष्ट केले. उर्वरित स्थानासाठी गोलंदाजांमध्ये स्पर्धा होयला हवी असे त्याने म्हटले आहे. सिराजला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक संघ व्यवस्थापनाची बाजू मांडली. हा निर्णय सामन्याची संपूर्ण परिस्थिती पाहून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मोहम्मद सिराजला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात संधी न दिल्याने कॉँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी केलेले विधान वादात सापडले आहे. चांगले कामगिरी आणि प्रदर्शन असून देखील सिराजला संधी दिली गेली नाही. त्याचे नाव ‘सिराज’ आहे त्यामुळे त्याला संधी दिली गेली नाही. खेळाडूचे नाव पाहून तुम्ही त्याला संघाबहेर ठेवणार असाल तर, हा पूर्णपणे धार्मिक भेदभाव असल्याचे खासदार मसूद यांनी म्हटले आहे.
Ans: मोहम्मद सिराजला अंतिम संघात स्थान न मिळाल्याने काँग्रेसने धार्मिक भेदभावाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Ans: मोहम्मद सिराजला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संधी न मिळाल्याने वीरेंद्र सेहवाग, सुनील गावस्कर आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली.