IPL 2025: Now the bowlers are not happy! It has come, 'Thala''s explosive prediction before IPL..
MS Dhoni : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 18 व्या हंगामचा थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतीय चाहते चॅम्पियन ट्रॉफीनंतर आता इंडियन प्रीमियर लीगची आतुरतेने वाट पाहत आहेत. जिथे चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे ही लीग थाला म्हणजेच एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी खूप जास्त महत्त्वाची ठरते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये धोनीचा स्फोटक अंदाज बघायाला मिळने यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक असतात. अशातच आता आयपीएल सुरू होण्याआधीच धोनीचा स्फोटक अंदाज समोर आला आहे.
लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स 23 मार्च रोजी चेन्नईमध्ये आमनेसामने भिडणार आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीसाठी आयपीएलचा 18वा सीझन खूप जास्त खास असणार आहे. धोनीचा हा शेवटचा हंगाम असण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे.
आयपीएल 2025 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच धोनीची आक्रमक अंदाज दिसायाला सुरुवात झाली आहे. 43 वर्षीय धोनी चेन्नई सुपर किंग्जच्या नेट सत्रात स्फोटक फलंदाजी करताना दिसून येत आहे. चेन्नईचा पहिला सामना त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकच्या मैदानावर होणार आहे. चेपॉकचे मैदान सीएसकेचा गड मानला जातो.
MS DHONI IN THE NETS DURING CSK’S PRACTICE SESSION AHEAD OF IPL 2025! 😍🔥
– Thala getting ready to light up IPL once again! 💛💥#MSDhoni #CSK #Thala #IPL2025 #ChennaiSuperKings #Yellove #Dhonipic.twitter.com/RkHAteELip
— Akaran.A (@Akaran_1) March 14, 2025
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये धोनी नेटवर जोरदार बॅटिंग करताना दिसत आहे. फलंदाजीच्या सराव सत्रात धोनी स्फोटक शैलीत खेळताना दिसला. माजी कर्णधार धोनीने नेटमध्ये फलंदाजीच्या सरावात जोरदार षटकार लागावले आहे. आयपीएलच्या शेवटच्या हंगामाच्या सुरुवातीला धोनीने सलामीवीर रुतुराज गायकवाडकडे संघाचे कर्णधारपद सोपवले होते.
यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघात रविचंद्रन अश्विन, महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा हे तडगे त्रिकूट नऊ सत्रांनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे आणि आता विक्रमी सहाव्या विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने सीएसके मैदानात उतरणार आहे.
रुतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), मथिसा पाथिराना, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, आर अश्विन, शिवम दुबे, खलील अहमद, नू विजय शंकर, नूर अहमद, सॅम कुरन, शेख रशीद, अंशुल कंबोज, दीपकुमार जाम, दीपकुमार, दीपकुमार, मुस्लीम, ना टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.