मास्टर्स मानांकन टेबल टेनिस स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया)
मुंबईतील मरीन लाईन्स येथील युनिव्हर्सिटी पॅव्हेलियनमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी जोरदार छाप पाडली. ४० वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित सुयोग पाटीलने पहिल्या दोन गेममधील पिछाडी भरून काढत अव्वल मानांकित सहकारी संतोष वाक्राडकरवर ९-११, ९-११, ११-८, ११-७, ११-८ अशी पाच गेममध्ये रोमांचक मात केली आणि विजेतेपद पटकावले.
Tennis: शौरेन सोमणची दमदार कामगिरी! १७ आणि १९ वर्षांखालील गटात विजेतेपदावर नाव कोरले
४५ वर्षांवरील पुरुष गटात पुण्याच्या ओंकार जोगने एकतर्फी लढतीत ठाण्याच्या सातव्या मानांकित सागर कुलकर्णीचा ११-१, ११-३, ११-७ असा सरळ गेममध्ये फडशा पाडला. ५० वर्षांवरील पुरुषांच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित उपेंद्र मुळ्येने (पुणे) अव्वल मानांकित नचिकेत देशपांडेचे कडवे आव्हान १४-१२, १२-१०, ७-११, ११-८ असे मोडून काढले. ५५ वर्षांवरील पुरुषांच्या गटात अव्वल मानांकित मनीष रावतने (सोलापूर) मुंबई शहरच्या नवीन सॅलियनचा ११-४, १२-१०, ११-७ असा पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. तर ५५ वर्षांवरील महिलांच्या अंतिम फेरीत मुंबई शहरच्या अव्वल मानांकित अनघा जोशीने ठाण्याच्या दुसऱ्या मानांकित तृप्ती माचवेचा ११-७, ९-११, ११-६, ११-७ असा चार गेममध्ये पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली.






