Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 1st T20 : ‘सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! ‘मिस्टर 360’ ची T20 मध्ये ‘या’ विक्रमात अव्वल स्थानी एंट्री 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 29, 2025 | 06:48 PM
ND vs AUS 1st T20: 'Suryakumar Yadav creates history! 'Mr 360' enters the top spot in 'Ya' record in T20

ND vs AUS 1st T20: 'Suryakumar Yadav creates history! 'Mr 360' enters the top spot in 'Ya' record in T20

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द 
  • या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने रचला इतिहास 
  • सूर्यकुमार यादवने फक्त ८६ डावांमध्ये १५० षटकार लागवले 

Suryakumar Yadav created history : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने एक ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. या सामन्यात, सूर्यकुमार यादवने केवळ त्याच्या संघाला चांगली सुरुवातच करून दिली नाही  तर टी-२० क्रिकेटमध्ये एक असा विक्रम देखील रचला आहे जो यापूर्वी जगातील फक्त चार फलंदाजांच्याच नावे आहे. या कामगिरीसह त्याने रोहित शर्मासारख्या दिग्गजाला देखील पिछाडीवर टाकले.

हेही वाचा : IND vs AUS 1st T20: कॅनबेरामध्ये ‘पावसा’ची फटकेबाजी! भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिला सामना रद्द; गिल-सूर्याची खेळी व्यर्थ

सूर्यकुमार यादवने इतिहास रचला

कॅनबेरा येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात, सूर्यकुमार यादवने दोन उत्कृष्ट षटकार खेचत त्याच्या टी-२० कारकिर्दीत १५० षटकारांचा टप्पा गाठला आहे. हा विक्रम करणारा तो जगातील फक्त पाचवा आणि भारतातील दुसराच खेळाडू ठरला. त्याच्या आधी, ही कामगिरी करण्याची किमया भारतीय संघाच्या हिटमॅन रोहित शर्माने  करून दाखवली आहे. तथापि, सूर्याने रोहितपेक्षा कमी डावांमध्ये हा टप्पा गाठला आहे.

रोहित शर्माने १११ डावांमध्ये १५० षटकार मारले आहेत, तर सूर्यकुमार यादवने फक्त ८६ डावांमध्ये हा टप्पा सर केला आहे.  यामुळे तो १५० टी-२० षटकार मारणारा सर्वात जलद भारतीय फलंदाज ठरला आहे. जगातील सर्वात जलद १५० षटकार मारण्याचा विक्रम संयुक्त अरब अमिरातीच्या मोहम्मद वसीमच्या नावावर जमा आहे, ज्याने ६६ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. त्यानंतर सूर्यकुमारचा क्रमांक लागतो. न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने १०१ डावांमध्ये, रोहित शर्माने १११ डावांमध्ये आणि इंग्लंडच्या जोस बटलरने १२० डावांमध्ये हा विक्रम करण्याची किमया केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, सूर्यकुमार यादव हा पूर्ण सदस्य देशांकडून १५० षटकार मारणारा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे.

Milestone unlocked 🔓 1️⃣5️⃣0️⃣ sixes and counting for Captain @surya_14kumar in T20Is 🔥 Updates ▶️ https://t.co/VE4FvHCa1u#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/wyLphOxwII — BCCI (@BCCI) October 29, 2025

सूर्या पुन्हा लयीत परतला

टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यातील सूर्यकुमार यादवने खेळलेली खेळी केवळ विक्रम मोडणारी नव्हती, तर फॉर्ममध्ये परतणे देखील उल्लेखनीय असेच होते. मागील पाच टी-२० सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव २० धावांपर्यंत देखील पोहोचू शकला नव्हता. २०२५ च्या आशिया कपमध्ये त्याची कामगिरी ही खूप निराशाजनक राहिली होती, जिथे त्याने सात सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावले नव्हते  आणि फक्त एकदाच २० धावा ओलांडल्या होत्या. तथापि, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात तो आत्मविश्वासाने खेळताना दिसून आला.

हेही वाचा : IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I मधून अर्शदीप सिंगला डच्चू! फुटले वादाला तोंड; चाहत्यांनी व्यक्त केला संताप

पावसामुळे सामाना रद्द

कॅनबेरा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे दोनदा थांबला होता, अखेर पावसाने आपली फटकेबाजी सुरू ठेवली. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. टीम इंडियाने स्कोअरबोर्डवर १ गडी गमावून ९७ धावा केल्या होत्या. दरम्यान, भारताला पहिला धक्का अभिषेक शर्माच्या रूपात लागला आहे.  शुभमन गिल ३७ धावा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव २४ चेंडूत ३९ धावा करून नाबाद राहिले.

Web Title: Nd vs aus 1st t20 suryakumar yadav breaks rohit sharmas record to become sixer king in t20 marathi sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Rohit Sharma
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs AUS 1st T20: कॅनबेरामध्ये ‘पावसा’ची फटकेबाजी! भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिला सामना रद्द; गिल-सूर्याची खेळी व्यर्थ 
1

IND vs AUS 1st T20: कॅनबेरामध्ये ‘पावसा’ची फटकेबाजी! भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिला सामना रद्द; गिल-सूर्याची खेळी व्यर्थ 

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I मधून अर्शदीप सिंगला डच्चू! फुटले वादाला तोंड; चाहत्यांनी व्यक्त केला  संताप
2

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I मधून अर्शदीप सिंगला डच्चू! फुटले वादाला तोंड; चाहत्यांनी व्यक्त केला  संताप

ICC Ranking : कर्णधार शुभमन गिलला हिटमॅनने टाकले मागे! रोहित शर्मा जगातील नंबर 1 ODI फलंदाज
3

ICC Ranking : कर्णधार शुभमन गिलला हिटमॅनने टाकले मागे! रोहित शर्मा जगातील नंबर 1 ODI फलंदाज

IND vs AUS T20 Toss Update : सुर्याच्या टोळीसमोर कांगारुचे आव्हान! मिचेल मार्शने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करणार
4

IND vs AUS T20 Toss Update : सुर्याच्या टोळीसमोर कांगारुचे आव्हान! मिचेल मार्शने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.