सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
India vs Australia first T20 match cancelled : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना कॅनबेरामध्ये खेळला गेला खरा परंतु, या मैदानावर पावसाने तूफान फटकेबाजी केल्याने पहिला सामना रद्द करण्यात आला. सुरुवातीपासूनच हवामानामुळे सामन्यात व्यत्यय आला, ज्यामुळे सामना १८ षटकांपर्यंत कमी करावा लागला. तथापि, खेळ पुन्हा सुरू झाला असताना, ४.४ षटकांनंतर पाऊस पुन्हा परतला, ज्यामुळे सामना थांबवण्यात आला. भारत या सामन्यात चांगलाच मजबूत स्थितीत होता, परंतु पावसाने खेळात खोडा घातला.
पाऊस थांबण्यापूर्वी, भारताने ९.४ षटकांत ९७ धावांवर एक विकेट गमावली होती. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल चांगली फलंदाजी करताना दिसत होते. दोन्ही फलंदाजांनी जलद धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. त्यांच्या फलंदाजीमुळे प्रेक्षकांना आशा निर्माण झाली आहे की ही जोडी मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
The first #AUSvIND T20I has been abandoned due to rain. 🌧️ Scorecard ▶️ https://t.co/VE4FvHBCbW#TeamIndia pic.twitter.com/biJYDFe9Ah — BCCI (@BCCI) October 29, 2025
सलामीवीर अभिषेक शर्मा या सामन्यात मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्याने १४ चेंडूंचा सामना करत १९ धावाच करू शकला. त्याला नाथन एलिसने बाद केले. त्यानंतर, धावांसाठी संघर्ष करणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवने चांगली फलंदाजी केली. आशिया कप २०२५ मध्ये त्याची बॅट शांतच राहिली होती, परंतु या सामन्यात त्याने दाखवून दिले की त्याचा फॉर्म पुन्हा परतला आहे.
भारतीय फलंदाजांकडून या डावात शानदार कामगिरी करण्यात आलो. सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आले. शुभमन गिलने उत्कृष्ट खेळ केला, त्याने २० चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ४ चौकार आणि १ षटकार लागवला. दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवने देखील त्याच्याच शैलीत फलंदाजी करताना केवळ २४ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. ऑस्ट्रेलियाकडून नाथन एलिसने १ विकेट काढली.






