
IND PAK Final match: Now even a small mistake will be costly..; New guidelines announced for India-Pakistan grand match!
दुबई पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आशिया कपच्या अंतिम सामन्याबाबत एक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, सामना सुरू होण्याच्या फक्त तीन तास आधी गेट उघडण्यात येणार आहे. स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी वैध तिकिटे अनिवार्य असणार आहेत. एकदा प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये प्रवेश केला की, त्यांना पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. प्रेक्षकांच्या प्रवेशाबाबतचे सर्व निर्णय हे स्टेडियम व्यवस्थापन घेईल आणि ते अंतिम असणार आहेत. तसेच, पार्किंग मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली आहेत. कोणत्याही परिस्थितीत प्रेक्षकांना यादृच्छिक ठिकाणी पार्क करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
दुबई पोलिसांकडून इशारा देण्यात अल आहे की, जो कोणी या नियमांचे उल्लंघन करेल किंवा सुरक्षिततेशी तडजोड करताना आढळेल त्याला कायदेशीर कारवाईस जावे लागणार आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचार, गैरवर्तन किंवा द्वेषपूर्ण टिप्पण्या करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशा गुन्ह्यांमुळे मोठा दंड आणि तुरुंगवास देखील होण्याची शक्यता आहे. म्हणून, अधिकाऱ्यांकडून सर्व प्रेक्षकांना खेळाच्या भावनेचा आदर करण्याचे आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. सामन्यायाधी टॉस होणार असून तो संध्याकाळी ७:३० वाजता होणार आहे. चाहते हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहू शकतात. याव्यतिरिक्त, सामना सोनी लाईव्ह आणि फॅनकोडवर ऑनलाइन स्ट्रीम करण्यात येऊ शकतो.