पाकिस्तान संघ(फोटो-सोशल मीडिया)
आशिया कप २०२५ च्या सुरुवातीला निवडण्यात आलेल्या पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुढील सामन्यात अनेक वेळा बदल करण्यात आले आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्यांचे संयोजन साधन्यामध्ये त्यांना बराच वेळ लागला आहे. परंतु सुपर फोरमध्ये भारताविरुद्धच्या दारुण पराभवानंतर त्यांनी चांगले पुनरागमन केले आहे. त्यानंतर पाकिस्तानने श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. म्हणूनच आता पाकिस्तान अंतिम फेरीत भारताविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही मोठे बदल करण्याची शक्यता फार कमी असल्याचे वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाकडून देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, धावांसाठी संघर्ष करणारा सॅम अयुब संघाचा भाग असणार आहे. मागील दोन सामन्यांमधील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली आहे. दरम्यान, भारतीय संघाचे स्पर्धेत सातत्यपूर्ण विजयी कामगिरी कायम ठेवून आपली अपराजित मालिका कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना केवळ खेळाडूंसाठीच नाही तर प्रेक्षकांसाठीही देखील अटीतटीचा असणार आहे. दोन्ही संघ आपली शक्ति पणाला लावून मैदानात उतरतील आणि विजेतेपद जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. भारत-पाकिस्तानमधील हा सामना आशिया कप २०२५ च्या इतिहासात दीर्घकाळ लक्षात ठेवला जाणार आहे.
साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, हुसेन तलत, सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.






