LSG vs PBKS: Chahal loses control after dismissing Nicholas Pooran! He makes derogatory comments, watch video
LSG vs PBKS : आयपीएल 2025 चा हा 18 वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाने एलएसजीचा पराभव केला आहे. या विजयाने पंजाबने या हंगामात सलग दुसऱ्या विजय मिळवला तर दुसरीकडे लखनऊचा मात्र दुसरा पराभव ठरला आहे. पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 8 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात एक प्रकार घडला. जो सध्या खूप व्हायरल झाला आहे. यामध्ये युजी चहलने निकोलस पूरनला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. ज्यानंतर युजवेंद्र चहलला खूप ट्रोल करण्यात येत आहे.
पंजाबने नाणेफेक जिंकत लखनौला प्रथम फलंदाजीला बोलावले. एलएसजी संघाने 7 गडी गमावून 171 धावा केल्या. या सामन्यात निकोलस पुरनने सर्वाधिक 44 धावा केल्या. मात्र, युझवेंद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी करत त्याला आपल्या जाळ्यात ओढले आणि आपला शिकार बनवले. पण, पूरणला बाद केल्यानंतर युजी त्यावरच थांबला नाही तर त्याने पुरनवर अश्लील कमेंट केली, ज्याचा व्हिडिओ आता वेगात व्हायरल होऊ लागला आहे.
निकोलस पुरन नेहमीप्रमाणे पंजाबच्याविरुद्ध गोलंदाजांना एकापाठोपाठ एक रिमांडवर घेताना दिसून आला. पण, युजीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याची विकेट घेतल्यानंतर यूजीला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि निघताना पूरनला त्याने शिवीगाळ केली. या व्हिडिओमध्ये युजी शिवीगाळ करताना दिसून येत आहे.
— akash singh (@akashsingh17654) April 1, 2025
पहिल्याच षटकात क्रीझवर फलंदाजीला आलेला नीकोलस पुरन सुरुवातीला थोडा संथगतीने खेळताना दिसला. काही वेळाने त्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यास सुरवात केली आणि पंजाबच्या गोलंदाजांना एक एक करून झोडपून काढले. यादरम्यान पूरनने 30 चेंडूंचा सामना करत 44 धावा चोपल्या. त्याने या खेळीत एकूण 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. या खेळीमुळे त्याने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप आपल्याकडे घेतली आहे.
काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाने एलएसजीचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयाने पंजाबने या हंगामात सलग दुसऱ्या विजय मिळवला तर दुसरीकडे लखनऊचा संघ मात्र दुसऱ्या पराभवाला सामोरा गेला.