Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! MS Dhoni किंवा Rohit Sharma नाही, तर ‘या’ कर्णधाराचा आयपीएलमध्ये सर्वोत्तम रेकॉर्ड! पाहा घातक आकडेवारी

जेव्हा आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांचा विषय निघतो, तेव्हा डोळ्यासमोर एमएस धोनी किंवा रोहित शर्मा यांची नावे येतात. मात्र, विजयाच्या टक्केवारीचा विचार केल्यास, एक भारतीय युवा खेळाडू या दोन्ही दिग्गजांपेक्षा सरस ठरला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 18, 2026 | 08:46 PM
MS Dhoni किंवा Rohit Sharma नाही, तर ‘या’ कर्णधाराचा आयपीएलमध्ये सर्वोत्तम रेकॉर्ड! (photo Credit- X)

MS Dhoni किंवा Rohit Sharma नाही, तर ‘या’ कर्णधाराचा आयपीएलमध्ये सर्वोत्तम रेकॉर्ड! (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • काय सांगता! MS Dhoni किंवा Rohit Sharma नाही
  • तर ‘या’ कर्णधाराचा आयपीएलमध्ये सर्वोत्तम रेकॉर्ड!
  • पाहा घातक आकडेवारी
IPL Most Successful Captain: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) नव्या हंगामाचा बिगुल वाजला असून, 28 मार्चपासून क्रिकेटच्या या महाकुंभाला सुरुवात होत आहे. 10 संघांच्या या लढतीत 31 मे रोजी कोणती टीम चषकावर आपले नाव कोरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जेव्हा आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांचा विषय निघतो, तेव्हा डोळ्यासमोर एमएस धोनी (MS Dhoni) किंवा रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची नावे येतात. मात्र, विजयाच्या टक्केवारीचा (Winning Percentage) विचार केल्यास, एक भारतीय युवा खेळाडू या दोन्ही दिग्गजांपेक्षा सरस ठरला आहे, तो म्हणजे श्रेयस अय्यर. (Shryas Iyer)

धोनी आणि रोहितपेक्षाही सरस कामगिरी

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सला प्रत्येकी 5 वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या धोनी आणि रोहितचा दबदबा सर्वश्रुत आहे. मात्र, आकडेवारीनुसार विजयाच्या टक्केवारीत श्रेयस अय्यरने या दोघांनाही मागे टाकले आहे. सध्या पंजाब किंग्सचे (Punjab Kings) नेतृत्व करणाऱ्या अय्यरने आतापर्यंत ज्या तीन संघांचे नेतृत्व केले, त्या तिन्ही संघांना त्याने अंतिम फेरीपर्यंत नेण्याचा पराक्रम केला आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच त्याचा विजयाचा दर धोनी आणि रोहितपेक्षा जास्त आहे.

स्टार क्रिकेटर Rinku Singh प्रिया सरोजसोबत ‘या’ दिवशी अडकणार लग्न बंधनात? वडील तुफानी सरोज यांनी दिली माहिती

आकडेवारी काय सांगते? श्रेयस अय्यरचा ‘विराट’ रेकॉर्ड

आयपीएलमध्ये किमान 50 सामन्यांत नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांचा विचार केला, तर श्रेयस अय्यर अव्वल स्थानी विराजमान आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखालील आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • एकूण सामने: 87 सामने
  • विजय: 50 सामने
  • पराभव: 35 सामने
  • विजयाची टक्केवारी: 58.82 टक्के

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असून त्याची विजयाची टक्केवारीदेखील 58.82 आहे, मात्र त्याने केवळ 51 सामन्यांत नेतृत्व केले आहे. एमएस धोनी 58.36 टक्क्यांसह तिसऱ्या, शेन वॉर्न (56.36 टक्के) चौथ्या आणि रोहित शर्मा 56.32 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

पंजाबचा ‘खिताबी दुष्काळ’ संपवणार का?

श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वाखाली 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला प्रथमच अंतिम फेरीत नेले होते. त्यानंतर 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) जेतेपद मिळवून दिले. गेल्या हंगामात पंजाब किंग्सचे कर्णधारपद भूषवताना त्याने संघाला फायनलपर्यंत मजल मारून दिली होती, मात्र जेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. या हंगामात पंजाब किंग्सचा पहिला सामना ३१ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. कोलकाताला चॅम्पियन बनवणारा अय्यर आता पंजाबचा अनेक वर्षांचा खिताबी दुष्काळ संपवून आपला रेकॉर्ड अधिक मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Jasprit Bumrah सारखा परफेक्ट कीलर यॉर्कर, नेट प्राक्टिसमध्ये Arjun Tendulkar चा जलवा, IPL पूर्वी खतरनाक फॉर्म!

Web Title: Not ms dhoni or rohit sharmathis captain holds the best record in the ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MS Dhoni Captain
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

‘पद्मश्री’ रोहित शर्मा! राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित होतानाचा ‘तो’ अभिमानास्पद क्षण, पहा Video
1

‘पद्मश्री’ रोहित शर्मा! राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित होतानाचा ‘तो’ अभिमानास्पद क्षण, पहा Video

IND Vs AFG Live: जयस्वालचे ‘यशस्वी’ शतक अन् रोहितचे आक्रमक…; भारताने अफगणिस्तान लोळवलं, मालिका खिशात
2

IND Vs AFG Live: जयस्वालचे ‘यशस्वी’ शतक अन् रोहितचे आक्रमक…; भारताने अफगणिस्तान लोळवलं, मालिका खिशात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.