
ODI Worldcup 2027 : विश्वचषक खेळण्याची 'या' खेळाडूंना मिळू शकते जागा, जाणून घ्या कोणाला लॉटरी लागणार?
प्लेइंग इलेव्हनबाबत विचार करता रोहित शर्मा, विराट कोहली व शुभमन गिल यांची जागा पक्की आहे. तसेच बॅकअपच्या रुपात यशस्वी जयस्वालचा संघात समावेश केला जाऊ शकतो. जयस्वालकडे भविष्यातील सलामीवीरच्या रुपात पाहिले जात आहे, त्यामुळे आगामी सर्व वनडे मालिकांमध्ये त्याने आपली जागा निश्चित केली आहे.
वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरने फलंदाजीत चौथ्या क्रमांकावरील जागा निश्चित केली आहे. या फलंदाजी क्रमवारीत श्रेयसचा दांडगा अनुभव आहे व त्याने चौथ्या क्रमांकावर येत आतापर्यंत 2000 धावा साकारल्या आहेत. तसेच यष्टीरक्षकच्या रुपात के. एल. राहुल संघ व्यवस्थापनाची पसंती असेल, जो पाचव्या क्रमांकावर सांभाळून खेळू शकतो. बॅकअप यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतील आणखीन एक पर्याय म्हणून रिषभ पंतची निवड होऊ शकते. दरम्यान, पंत सध्या वनडे संघाचा भाग नाही.
दरम्यान, 2027 विश्वचषकाचे सामने आफ्रिकेच्या खेळपट्टीवर खेळवण्यात येत असल्याने, येथे मॅनेजमेंट जास्तीत जास्त वेगवान गोलंदाजांची निवड करेल. मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे की, वेगवान गोलंदाज अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी व हार्दिक पंड्या या दोघांनी विश्वचषक पथकातील आपली जागा पक्की केली आहे. तसेच फिरकीपटूंच्या रुपात रविंद्र जडेजा विश्वचषक खेळू शकतो. वॉशिंग्टन सुंदरला बॅकअप अष्टपैलूच्या रुपात आफ्रिकेसाठी संघात जागा मिळेल.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमहार भारताच्या पेस अटॅकला लीड करेल. त्याच्या सहकार्यासाठी मोहम्मद सिराज आणि हर्षित राणाला स्क्वॉडमध्ये जागा मिळू शकते. हर्षित राणा मागील काही दिवसांपासून जायबंद आहे, पण दक्षिण आफ्रिकेवरील खेळपट्टींवरील त्याची उंची, धोकादायक पेस व बाउंस करण्याची टेक्निक फायद्याची ठरू शकते. तो त्याशिवाय फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. कुलदीप यादव मुख्य फिरकीपटूच्या भुमिकेत येथे दिसू शकतो.
रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.