Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs SA : आता ‘किंग’ कोहलीला विसरा! बाबर आझम राहील लक्षात, टी-२० क्रिकेटमध्ये रचला खास विक्रम

पाकिस्ताचा स्टार फलंदाज बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. तो आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डावांमध्ये ५०+ धावा करणारा जगातील पहिलाच फलंदाज बनला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 02, 2025 | 02:55 PM
PAK vs SA: Forget 'King' Kohli now! Babar Azam will be remembered, created a special record in T20 cricket

PAK vs SA: Forget 'King' Kohli now! Babar Azam will be remembered, created a special record in T20 cricket

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा विक्रम 
  • आझम टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक डावांमध्ये ५०+ धावा रकणारा पाहिलचा खेळाडू 
  • पाकिस्तानने मालिका २-१ अशी जिंकली 
Babar Azam breaks Virat Kohli’s record : पाकिस्ताचा स्टार फलंदाज बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डावांमध्ये ५०+ धावा करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. या खास बाबतीत, त्याने भारतीय दिग्गज फलंदाज विराट कोहलीला देखील मागे टाकले आहे. भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने २०१० ते २०२४ दरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३९ डावांमध्ये ५०+ धावा फटकावल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावून बाबरने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला. आता बाबर आझमच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४० डावांमध्ये ५०+ धावा करण्याचा विक्रम जमा झाला आहे.

हेही वाचा : IND W vs SA W Final Match Live :गंभीर आणि सूर्याकडून भारतीय महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव; दिला खास मंत्र; पाहा Video

बाबरच्या बॅट तळपली

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतिला तिसरा आणि शेवटचा १ नोव्हेंबर रोजी गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने सहा चेंडू शिल्लक असताना चार विकेट राखून विजय मिळवला.  प्रतिस्पर्ध्याच्या १४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बाबर आझमने शानदार कामगिरी केली. तो पाकिस्तानसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरून त्याने एकूण ४७ चेंडूंचा सामना केला आणि १४४.६८ च्या स्ट्राईक रेटने ६८ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ९ चौकार लगावले.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डावांमध्ये ५०+ धावा करणारे ५ फलंदाज

  1. ४० – बाबर आझम – पाकिस्तान
  2. ३९ – विराट कोहली – भारत
  3. ३७ – रोहित शर्मा – भारत
  4. ३१ – मोहम्मद रिझवान – पाकिस्तान
  5. २९ – डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया
हेही वाचा : IND W vs SA W Final : अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने केली विजयासाठी गर्जना, म्हणाली, “आम्हाला पराभवाचे दुःख माहित आहे पण…”

पाकिस्तानने मालिका टाकली खिशात

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात आली.  पाकिस्तानी संघाने मालिका २-१ अशी जिंकण्यात यश मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिला सामना ५५ धावांनी जिंकला. परंतु,  त्यानंतर पाकिस्तानने दुसरा सामना ९ विकेट राखून आणि तिसरा सामना ४ विकेट राखून जिंकला व मालिका २-१ अशी खिशात घातली.

Web Title: Pak vs sa babar azam breaks virat kohlis record to create history in t20 cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • PAK vs SA
  • T20 cricket
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमधील पाचव्या T20I सामन्यावर ‘रद्द’ चे सावट? जाणून घ्या हवामान अहवाल
1

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमधील पाचव्या T20I सामन्यावर ‘रद्द’ चे सावट? जाणून घ्या हवामान अहवाल

IND vs SA 4th T20I : अखेर लखनौ टी-20 सामान्याबद्दल BCCI ने केली चूक मान्य! आगामी मालिकांच्या वेळापत्रकाबाबत काळजी घेणार 
2

IND vs SA 4th T20I : अखेर लखनौ टी-20 सामान्याबद्दल BCCI ने केली चूक मान्य! आगामी मालिकांच्या वेळापत्रकाबाबत काळजी घेणार 

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये भारतच ‘बॉस’! पाचव्या T20 सामन्याचे गणित काय?वाचा सविस्तर
3

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये भारतच ‘बॉस’! पाचव्या T20 सामन्याचे गणित काय?वाचा सविस्तर

IND vs SA 4th T20I : तिकीटासाठी पठ्ठ्याने गव्हाचे 3 पोते विकले! सामना रद्द अन् चाहत्याचा संताप अनावर; Video Viral
4

IND vs SA 4th T20I : तिकीटासाठी पठ्ठ्याने गव्हाचे 3 पोते विकले! सामना रद्द अन् चाहत्याचा संताप अनावर; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.