गंभीर आणि सूर्यकुमारने दिल्या भारतीय महिला संघाला शुभेच्छा(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs SA W Women’s World Cup Final : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आज एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहे. यावेळी, टीम इंडिया ही मेगा स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. अंतिम सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी, भारतीय महिला संघांवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. दरम्यान भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी देखील आता महिला संघाच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्याकडून एक खास संदेश देणारा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा : IND vs AUS 3rd T20 : शेवटी भारताने टाॅस जिंकला… करणार गोलंदाजी! टीम इंडियाने केले तीन बदल
महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्याबाबत चाहते खूप उत्साहित दिसत आहेत. भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी महिला संघाला प्रोत्साहन देत म्हटले की, “मी भारतीय महिला संघाला शुभेच्छा देऊ इच्छितो. फक्त या क्षणाचा आनंद घ्या. न घाबरता क्रिकेट खेळा आणि चुका करण्यास घाबरू नका. तुम्ही याआधीच संपूर्ण देशाला अभिमानित केले आहे.”
भारतीय संघाचा सूर्यकुमार यादव म्हणाला की, “मी संपूर्ण महिला संघाला विश्वचषक फायनलसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. तुमचा आतापर्यंतचा प्रवास अविश्वसनीय असाच राहिला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने खेळला आहात तसेच खेळत राहा.”
‘𝐄𝐧𝐣𝐨𝐲 𝐭𝐡𝐞 𝐨𝐜𝐜𝐚𝐬𝐢𝐨𝐧, 𝐛𝐞 𝐟𝐞𝐚𝐫𝐥𝐞𝐬𝐬’ 💙 #WomenInBlue, you’ve got one 𝙨𝙥𝙚𝙘𝙞𝙖𝙡 𝙢𝙚𝙨𝙨𝙖𝙜𝙚 from the #MenInBlue ahead of the #Final 📩🇮🇳#TeamIndia | #CWC25 | #INDvSA | @BCCIWomen pic.twitter.com/qG5chQgszY — BCCI (@BCCI) November 1, 2025
तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहमे देखील शुभेच्छा देत म्हणाला की, “तुम्हाला विश्वचषक फायनल खेळण्यासाठी फारशा संधी मिळणार नाहीत. म्हणून या क्षणाचा आनंद घ्यावा. तुम्हाला वेगळे काही एक करण्याची गरज नाही; फक्त तुमचा नैसर्गिक खेळ खेळत राहा.”
गंभीर आणि सूर्या व्यतिरिक्त, भारतीय संघाचे अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा, अक्षर पटेल, शुभमन गिल, शिवम दुबे, जितेश शर्मा, रिंकू सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी देखील भारतीय महिला संघाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .
नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियमवर अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरचा संघ इतिहास रचण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय महिला संघाने अद्याप एकही विश्वचषक जिंकलेला नाही, परंतु यावेळी ते दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जेतेपदावर आपले नाव कोरण्याचे लक्ष्य ठेवणार आहेत.






