फोटो सौजन्य - जिओहाॅटस्टार
India vs Australia 3rd T20 Toss Update : भारताचा पुरुष संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता भारतीय संघ तिसऱ्या सामन्यामध्ये विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श हे दोघे नाणेफेकीसाठी एकत्र आले आहेत.
भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यामध्ये भारतीय संघाची फारच निराशाजनक फलंदाजी राहिली होती. अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा हे वगळता एकही खेळाडूने 10 चा आकडा पार केला नव्हता. भारतीय फलंदाजांकडून आज चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने तीन बदल केले आहेत. भारत विरुद्द ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा सामना खेळवला जात आहे हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा आहे.
3rd T20I. India won the toss and elected to field. https://t.co/X5xeZ0Mc5a #TeamIndia #AUSvIND #3rdT20I — BCCI (@BCCI) November 2, 2025
भारताच्या संघाने त्याच्या प्लेइंग ११ मध्ये तीन बदल केले आहेत, या सामन्यामध्ये आज हर्षित राणाला बाहेर केले आहे आणि या सामन्यामध्ये अर्शदीप सिंगला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर मागील सामन्यामध्ये विकेटकिपर म्हणून संजू सॅमसनला स्थान मिळाले होते या सामन्यात त्याला वगळण्यात आले आहे. तर त्याच्या जागेवर जितेश शर्माला संघामध्ये स्थान मिळाले आहे. तर तिसरा बदल हा भारतीय संघाने कुलदीप यादवला संघामधून बाहेर केले आहे त्याच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळाले आहे.
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू शॉर्ट, शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुह्नेमन.






