
ENG Vs PAK: पाकिस्तानला दुहेरी धक्का! babar Azam सामन्याबाहेर; तर पहिल्याच बॉलवर...
आजपासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना सुरू झाला आहे. लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी, पहिल्याच बॉलवर पाकिस्तानचा सलामीवीर अझान ओवैस आउट झाला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने टाकलेल्या पहिल्याच इन-स्विंग चेंडूवर अझान ओवैस एलबीडब्ल्यू झाला.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानचा फलंदाज पहिल्याच बॉलवर आउट होण्याची दुसरी वेळ आहे. तर पहिल्याच बॉलवर कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्याची इंग्लंडच्या गोलंदाजांची ही चौथी वेळ आहे. ओली रॉबिन्सनने मालिकेची सुरुवात अत्यंत भेदक केली. पहिल्याच चेंडूवर अझान ओवैसला बाद केल्यानंतर त्याने आपल्या तिसऱ्याच षटकात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदलाही बाद करून पाकिस्तानची अवस्था बिकट केली.
PAK Vs WI: रेकॉर्ड असा करा की चाहते शिव्या घालतील! Babar Azam ने नावावर केला ‘हा’ दळभद्री विक्रम
इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि पुन्हा एकदा कर्णधारपद सांभाळणारा बाबर आझम उजव्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे लीड्स येथील पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याची उणीव पाकिस्तान संघला जाणवत आहे. पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाला आहे.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! PCB ची मोठी कारवाई; स्टार खेळाडूवर घातली २ वर्षांची बंदी