कर्णधार बाबर आझम (फोटो- ians)
टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक वेळेस रन आउट होण्याच्या यादीत बाबर आझम दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. या यादीमध्ये त्याने वसिम अक्रम आणि अजहर अलीची बरोबरी केली आहे. बाबर आझम आतापर्यंत तब्बल 7 वेळेस टेस्ट क्रिकेटमध्ये रन आउट झाला आहे. पाकिस्तान सर्वाधिक वेळेस रनआउट होण्याचा विक्रम हा जावेद मियादादच्या नावावर आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम याला पुन्हा एकदा दुर्दैवी पद्धतीने बाद होऊन मैदानाबाहेर जावे लागले आहे. गेल्या चार वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याची त्याची प्रतीक्षा अजूनच लांबली आहे. सामन्यादरम्यान पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत होता.
WI vs PAK: 4 चेंडूत 3 विकेट, 34 वर्षाच्या बॉलरने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; 5 मिनिटात नेस्तनाबूत
बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक या दोघांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत मैदानात पाय रोवले होते. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटीसाठी १८३ धावांची शानदार भागीदारी झाली होती. बाबर आझम ८८ धावांवर खेळत होता आणि सहजपणे आपल्या शतकाकडे वाटचाल करत होता.मात्र एक रन काढण्याच्या नादात कर्णधार बाबर आझम रन आउट झाला आणि त्याचे शतक करण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला अत्यंत रोमांचक वळण मिळाले आहे. पहिल्या डावात कर्णधार बाबर आझम धावबाद झाल्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी अचानक घसरली. मात्र, गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने या सामन्यावर आपली मजबूत पकड मिळवली आहे. तिसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव पार कोलमडला आहे.
उरली सुरली इज्जत वाचवण्यासाठी PCB चा मोठा निर्णय; ‘या’ अनुभवी खेळाडूवर दिली बॅटिंग कोचपदाची जबाबदारी






