Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs AUS: कांगारू ढेपाळले! पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; 2-1 ने मालिका घातली खिशात

Pakistan Beat Australia Won ODI Series: तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने परावभ करत मालिका २-१ ने जिंकली. यामुळे पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 05, 2026 | 05:24 PM
PAK vs AUS: कांगारू ढेपाळले! पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; 2-1  ने मालिका घातली खिशात
Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियाचा गेम ओव्हर
  • पाकिस्तानने कांगारुंना चारली धूळ
  • 2-1 ने मालिका घातली खिशात
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सने पराभव केला. गद्दाफी स्टेडियमवर, कांगारू फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजांसमोर सहज गारद झाले आणि संपूर्ण संघ केवळ १५७ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानने ४१.५ ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून १५८ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. निर्णायक सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. हा विजय पाकिस्तानसाठी अत्यंत खास मानला जात आहे.

IND vs AFG: टीम इंडियातून Rishabh Pant ची हकालपट्टी का झाली? गौतम गंभीर यांचा मोठा खुलासा

ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर आटोपला

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच कांगारू फलंदाजांवर दबाव निर्माण केला. नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्याने ऑस्ट्रेलियाला मोठी भागीदारी उभारता आली नाही. मॅथ्यू शॉर्ट शून्यावर बाद झाला. मार्नस लॅबुशेन १९ धावांवर बाद झाला. अॅलेक्स कॅरी १९ धावांवर हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. कॅमेरॉन ग्रीन केवळ ७ धावांवर बाद झाला. मॅट रेनशॉ ४ आणि कूपर कॉनोली ३ यांनाही फलंदाजीत विशेष योगदान देता आले नाही. जोश इंग्लिसने ७१ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक ६५ धावा केल्या, पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १५७ धावांवर सर्वबाद झाला.पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांनी भेदक मारा करत महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदीने ३० धावांत ३ विकेट्स घेतले, तर अबरार अहमद आणि शादाब खान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले.

बाबर आझमची विजयी खेळी

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात थोडी सावध झाली. मात्र कर्णधार बाबर आझमने जबाबदारीने फलंदाजी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. साहिबजादा फरहान अवघ्या ६ धावांवर नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. माझ सदाकतला २६ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह २७ धावा करून बाद झाला. बाबर आझमने ८४ चेंडूंमध्ये ४० धावा करत म्हत्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर, गाझी घोरी अवघ्या ८ धावांवर बाद झाला. सलमान आगा १५ धावा करून विशेष प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. मात्र, अब्दुल समद आणि शादाब खान यांनी ४९ धावांची भागीदारी करून पाकिस्तानला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला. शादाब ४२ चेंडूंमध्ये २९ धावांवर नाबाद राहिला, तर अब्दुल १८ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनेमनने ३ विकेट्स घेतले, तर नॅथन एलिस आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

IND vs AFG कसोटीपूर्वी कोचचा ‘गंभीर’ निर्णय; साई सुदर्शन ओपन नव्हे तर थेट…; टीम इंडियात मोठा बदल

Web Title: Pakistan vs australia 3rd odi series win 2 1 babar azam shaheen afridi gaddafi stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • PAK vs AUS
  • Pakistan Cricket Board

संबंधित बातम्या

अत्यंत खराब खेळ शिकायचा आहे? मग Pakistan कडे पहा; ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाबर आझम अन्…
1

अत्यंत खराब खेळ शिकायचा आहे? मग Pakistan कडे पहा; ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाबर आझम अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.