क्रिकेटपटूंसाठी BCCI चे नवे निवृत्ती धोरण; परदेशी लीगमध्ये खेळायचे असेल तर मोजावी लागेल मोठी किंमत
‘टिम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले की, ‘ साई सुदर्शनला कसोटी क्रिकेटमध्ये योग्य संधी मिळालेली नाही. तो इंग्लंडमध्ये बहुतेक सामने खेळला आहे त्यामुळे त्याच्या क्षमतेचे पूर्ण मूल्यमापन होऊ शकत नाही. मला वाटते की त्याला योग्य संधी मिळायला हवी.’ गंभीर यांनी स्पष्ट संकेत दिले की, देवदत्त पडिक्कलपेक्षा साई सुदर्शनला प्राधान्य दिले जाईल. साई सुदर्शनने IPL 2026 मध्ये दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. गुजरात टायटन्ससाठी खेळताना त्याने सातत्यपूर्ण धावा केल्या आणि अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. त्याच्या दमदार फलंदाजीमुळे संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.
गंभीर पुढे म्हणाले की, ‘आम्ही ११ खेळाडू निवडू शकतो आणि साई खराब फॉर्ममध्ये नाही. त्याने आयपीएलमध्ये ७०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जर आपण चार-पाच सामन्यांच्या आधारावर साईचे मूल्यांकन करु शकत नाही. मानव आणि हर्ष काही प्रमाणात सारखेच खेळाडू आहेत, पण त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीत काही फरक आहेत. ऑगस्टमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आम्ही श्रीलंकेला चार फिरकी गोलंदाज घेऊन जाणार असल्याने, हा सामना आम्हाला आमच्या चौथ्या फिरकी गोलंदाजाला तयार करण्यास मदत करेल. भारताला फिरकी गोलंदाजीचे अनेक पर्याय तयार ठेवावे लागतील. गंभीर पुढे म्हणाले की, ‘जेव्हा आम्ही न्यूझीलंड दौऱ्यावर जाऊ, तेव्हा आम्हाला वेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागेल. कसोटी सामन्यांसाठी अधिक चांगली तयारी करण्याची गरज आहे, असे आम्हाला वाटते.”
भारतीय क्रिकेट संघ ६ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. हा कसोटी सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नसला तरी, आगामी मालिका आणि महत्त्वाच्या सामन्यांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे.






