Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती हा शहाणपणा…आशिया कप 2025 मध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानने सुचवला नवा पर्याय! अफगाणिस्तानसोबत खेळणार महत्त्वाची मालिका

आशिया कपच्या आयोजनाबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, पीसीबीने अफगाणिस्तान बोर्डाशी चर्चा सुरू केली आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान ऑगस्टमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 13, 2025 | 11:26 AM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Follow Us:

चॅम्पियन ट्राॅफी ही हायब्रिड पद्धतीने खेळवला जाणार यावरुन मोठा वाद झाला होता. तरिही भारताचा संघ हा चॅम्पियन ट्राॅफी 2025 साठी पाकिस्तानला गेला नाही भारतीय संघाचे सर्व सामने हे दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत जेतेपद जिंंकले. आता आणखी एका वादाला तोंड फुटले आहे. आशिया कप सप्टेंबरमध्ये खेळवला जाणार आहे आणि भारताला त्याचे आयोजन करण्याचा अधिकार आहे. यासंदर्भात अजुनपर्यत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

आता पाकिस्तान आशिया कपआधी नवी उपाययोजना आखण्याच्या इराद्यात आहे. आशिया कप रद्द झाल्यास किंवा पुढे ढकलल्यास ऑगस्टमध्ये ट्राय सिरीज आयोजित करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यूएई आणि अफगाणिस्तानशी चर्चा करत आहे. आशिया कपच्या आयोजनाबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, पीसीबीने अफगाणिस्तान बोर्डाशी चर्चा सुरू केली आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान ऑगस्टमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे.

“पाकिस्तान आणि भारत यांच्यातील बिघडलेल्या संबंधांमुळे सप्टेंबरमध्ये भारतात आशिया कप होण्याची शक्यता कमी असल्याने, पीसीबी आणखी एका ट्राय सिरीजच्या प्रस्तावावर काम करत आहे,” असे पीसीबीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. जर आशिया कप यूएईमध्ये झाला तर पाकिस्तान ऑगस्टमध्ये दुबईमध्ये अफगाणिस्तान आणि यूएईसोबत त्रिकोणी मालिका खेळेल. ही मालिका अफगाणिस्तानच्या पाकिस्तान दौऱ्याची जागा घेईल.

भारत आणि इंग्लंड या देशांना मागे टाकून नेदरलँड्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास! पहिल्यांदाच केला पराक्रम

ते म्हणाले की, त्रिकोणी मालिका आयोजित करण्यासाठी पीसीबी आधीच दोन्ही क्रिकेट बोर्डांशी चर्चा करत आहे. जर आशिया कप पुढे ढकलला गेला तर पीसीबीला ऑगस्टमध्ये अफगाणिस्तान आणि यूएई संघांनी पाकिस्तानमध्ये ट्राय सिरीज खेळावी अशी इच्छा आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. आशिया कपबाबत निर्णय घेण्यासाठी एसीसी लवकरच बैठक घेणार आहे.

पाकिस्तानचा नुकताच बांग्लादेशविरुद्ध मालिका खेळवण्यात आल्या होत्या यामध्ये त्यांनी बांग्लादेशच्या संघाला व्हाइट वाॅश केले. अजुनपर्यत आशिया कप खेळवला जाणार आहे की नाही यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारताचा संघ हा इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय पुरुष संघ हा 20 जूनपासुन कसोटी मालिका खेळणार आहे, तर भारतीय महिला संघ देखील इंग्लड दौऱ्यावर असणार आहे. आता भारताची इंग्लड दौऱ्यावर कशी कामगिरी राहिल याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

Web Title: Pakistan will play tri series against afghanistan and uae without playing in asia cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 11:03 AM

Topics:  

  • Asia Cup
  • cricket
  • PAK vs AFG
  • PCB Cricket
  • Sports

संबंधित बातम्या

Asia Cup 2026: विजयाचा श्रीगणेशा! थायलंडचा धुव्वा अन् आता 3 तारखेला ‘या’ संघाशी भिडणार
1

Asia Cup 2026: विजयाचा श्रीगणेशा! थायलंडचा धुव्वा अन् आता 3 तारखेला ‘या’ संघाशी भिडणार

IND vs THA Live: थायलंडने टॉस जिंकला! भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय; प्रतिका रावलला डेब्यू कॅप
2

IND vs THA Live: थायलंडने टॉस जिंकला! भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय; प्रतिका रावलला डेब्यू कॅप

IND vs THA: आशिया कपमध्ये आज भारताची पहिली परीक्षा! टीम इंडियासमोर थायलंडचे आव्हान; कधी, कुठे अन् किती वाजता पाहाल LIVE सामना?
3

IND vs THA: आशिया कपमध्ये आज भारताची पहिली परीक्षा! टीम इंडियासमोर थायलंडचे आव्हान; कधी, कुठे अन् किती वाजता पाहाल LIVE सामना?

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल
4

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.