भारतीय महिला विश्वचषकाला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यामध्ये भारताच्या संघाने मागीला काही मालिकांंमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. विश्वचषकाआधी कोणत्या भारताच्या महिला खेळाडूंनी संघासाठी सर्वाधिक धावा केल्या यात टाॅप 5 फलंदाजांच्या कामगिरीबद्दल जाणुन घ्या.
भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटर. फोटो सौजन्य - X
भारताच्या संघाची माजी खेळाडू महिला क्रिकेटमधील दिग्गज मिताली राज हिने संघासाठी आतापर्यत सर्वाधिका धावा केल्या आहेत. तिने त्याच्या कारकिर्दीमध्ये 232 सामने खेळले आहेत. यामध्ये तिने आतापर्यत 7805 धावा केल्या आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिने क्रिकेट विश्वामध्ये खळबळ उडवली आहे. तिने आतापर्यत कमालीची कामगिरी संघासाठी सातत्याने केली आहे. तिच्या या 11 वर्षाच्या करिअरमध्ये तिने आतापर्यत 105 सामने खेळले आहेत. यामध्ये तिने 4588 धावा केल्या आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे. तिने आतापर्यत 149 सामने खेळले आहेत. यामध्ये तिने 4069 धावा केल्या आहेत. यात 7 शतके आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. मागिल मालिकेमध्ये तिने शतकही झळकावले होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर अंजुम चोप्रा आहे. तिने तिच्या कारकिर्दिमध्ये आतापर्यत 127 सामने खेळले आहे, यात तिने 2856 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
या यादीमध्ये टाॅप 5 च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर दिप्ती शर्मा आहे. तिने मागिल काही सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली आहे. तिने आतापर्यत तिच्या कारकिर्दिमध्ये आतापर्यत 109 सामने खेळले आहे, यात तिने 2392 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया