पॅरिस ऑलिम्पिकचा २०२४ : पॅरिस ऑलिम्पिकची मोहीम २६ जुलैपासून सुरु झाली आहे. अनेक खेळ दोन दिवस आधी म्हणजेच २४ जुलैपासून सुरू झाले होते. तथापि, अधिकृत उद्घाटन समारंभ २६ जुलै रोजी झाला. पॅरिसमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक खेळाचा चाहत्यांनी आनंद लुटला आहे. आज पॅरिसचा दोन दिवसानंतर सुरू आहे आणि आता पॅरिसमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशी माहिती समोर आली आहे की, इंग्लिश ऍथलीटला कोरोनाची लागण झाली आहे. हे कसे काय घडले आणि आणखी किती खेळाडूंना कोरोनाची लागणं झाली आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे.
ब्रिटीश जलतरणपटू ॲडम पीटी याला कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती देण्यात आली आहे. ॲडमने २८ जुलै रोजी १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत पदक जिंकले. १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेला ॲडम पीटी हा मेडल जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती. या स्पर्धेत निकोलो मार्टिनेंगीने सुवर्णपदक जिंकले. याशिवाय ॲडम अमेरिकन जलतरणपटू निक फिंकच्या संपर्कात आला. २८ जुलै रोजी सकाळी ब्रिटीश जलतरणपटू ॲडम पीटी याची तब्बेत खराब झाली होती. मात्र तरीही अंतिम सामन्यामध्ये त्याने भाग घेण्याचा निर्णय घेतला होता. अंतिम सामना खेळल्यानंतर ॲडमची प्रकृती खालावली आणि चाचणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये कोविड-१९ बाबत कोणतेही नियम नाहीत. याआधी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कोविड-१९ बाबत खूप कडक कारवाई करण्यात आली होती.
भारताने पॅरिसमध्ये आतापर्यत १ पदक जिंकले आहे. मनू भाकरने भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. आणखी भारतीय खेळाडू किती पदकांची कमाई करतील हे पाहणे महत्वाचे ठरेल. आज भारताचे खेळाडू पदकाची लढणार आहेत.