फोटो सौजन्य - IndiaSportsHub X अकाउंट
भारतीय तिरंदाज : आज म्हणजे 26 जुलै रोजी पॅरिस ऑलम्पिकचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. परंतु त्यापूर्वी 25 जुलै रोजी भारतीय तिरंदाज ॲक्शनमध्ये दिसले. यामध्ये भारतीय महिला संघातील तिरंदाजानी चौथे स्थान होऊन उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तर भारताची महिला तिरंदाज अंकिता भगत हिने अकरावे स्थान गाठून चांगली खेळी खेळली. दुसरीकडे पुरुष तिरंदाज संघाच्या कामगिरीबद्दल विचार केला तर भारतीय पुरुष संघाने ऑलम्पिकमध्ये तिसरे स्थान गाठले आहे आणि उपांत्य फेरीपूर्व फेरी गाठली आहे.
एवढेच नव्हे तर भारतात स्टार तिरंदाज धीरज बोम्मादेवराने ऑलम्पिकमध्ये चौथे स्थान गाठून वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुद्धा स्थान मिळवले आहे. 720 पैकी 681 गुण मिळवून धीरज बोम्मादेवराने ऑलम्पिकमध्ये माघारी असताना 4 स्थान गाठले आहे. चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला तरुणदीप रायने सुद्धा दमदार कामगिरी केली आहे त्याने ऑलिम्पिकच्या रँकिंग स्पर्धेमध्ये 14 वे स्थान गाठून आपले स्थान मिळवले आहे.
धीरज आणि अंकिता भगत यांचे गुण मिळवून भारताचा मिक्स तिरंगा संघ पाचव्या स्थानावर राहिला. यामध्ये सुद्धा टीम इंडियाने उपांत्यपूर्व फेरी गाठले आहे. त्यामुळे तीनही कॅटेगिरीमध्ये भारताच्या संघाने मेडलचा मार्ग थोडा मोकळा केला आहे, त्यामुळे मेडलपासून फार वेळ दूर नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
Summary for Today | India
Today’s performance #Archery
Women’s Archery👩
Individual:-
11)Ankita Bhakat- 666
22)Bhajan Kaur- 659
23)Deepika Kumari- 658Women’s team – 4th
Women’ team will probably face korea in semifinalsMen’s Archery👦
Individual:-
4) Dhiraj… pic.twitter.com/gFSExXCirq
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) July 25, 2024
भारतीय महिला संघामध्ये दीपिका कुमारी अंकिता भगत आणि भजन कार या तिरंदाजांचा समावेळ आहे. तर पुरुष तिरंदाज संघामध्ये धीरज प्रवीण जाधव आणि तरुणदीप राय या पुरुषांचा समावेळ आहे. ऑलम्पिकच्या मिक्स तिरंदाजी इव्हेंट्समध्ये भारताचे धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भगत हे पाचव्या स्थानावर राहून उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचले आहेत.
भारतीय तिरंदाजांचे पुढील सामने २९ जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये भारताचा महिला संघ त्याचबरोबर पुरुष संघ क्वाटर फायनलचे एलिमिनेशन सामने खेळणार आहे. त्यामुळे हे दोन्ही संघासाठी महत्वाचे असणार आहेत.
तारीख | तिरंदाजाचे नाव | कोणाशी होणार सामना |
29 जुलै | पुरुष तिरंदाज संघ | फ्रान्स |
29 जुलै | महिला तिरंदाज संघ | नेदरलँड किंवा फ्रान्स |
29 जुलै | धीरज बोम्मादेवरा | ॲडम ली (झेक रिपब्लिक) |
29 जुलै | अंकिता भकत | |
29 जुलै | भारतीय तिरंदाज मिक्स टीम | साऊथ कोरिया किंवा चीन |