
महत्वाचे खेळाडू पीसीबी कॉंट्रॅक्टमधून बाहेर
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २१ नोव्हेंबर २०२६ रोजी पुरुष क्रिकेटपटूंच्या 2026-2027 साठी केनतरल कॉंट्रॅक्टची यादी जाहीर केली आहे. मागील वेळेस या कॉंट्रॅक्टमध्ये 30 खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. मात्र यंदा या यादीत जवळपास 38 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून अनेक वरिष्ठ खेळाडूंचा पत्ता कट झाला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यंदाच्या नव्या सेंट्रल कॉंट्रॅक्टमध्ये मोहम्मद रिझवान, शान मसूद आणि सॅम अयुब या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. यंदा विविध गटांमध्ये तब्बल 38 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. सर्व खेळाडूंचे लक्ष त्यांच्या त्यांच्या फॉर्मटनुसार व्हावे आणि नवीन खेळाडूंना संधी मिळावी यासाठी असे नियोजन करण्यात आल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणणे असल्याचे समोर येत आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2026-2027 च्या सेंट्रल कॉंट्रॅक्टची यादी जाहीर केली आहे. एकूण ३८ खेळाडूंची पाच वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘AB’ गटात बाबर आझम आणि सलमान अली यांना बोर्डाने स्थान दिले आहे. ३८ खेळाडूंना पाच श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.
Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…
| गट | पात्रता / निकष | समावेश असलेले प्रमुख खेळाडू / वैशिष्ट्य |
| AB गट | कसोटी आणि वन-डे खेळणारे खेळाडू | बाबर आझम, सलमान अली आगा |
| A गट | केवळ कसोटी खेळणारे खेळाडू | कसोटी विशेषज्ञ खेळाडू |
| BC गट | वन-डे आणि टी-२० खेळणारे खेळाडू | मर्यादित षटकातील प्रमुख खेळाडू |
| C गट | केवळ टी-२० खेळणारे खेळाडू | टी-२० फॉरमॅटमधील खेळाडू |
| D गट | उभरते आणि युवा खेळाडू | भविष्यासाठी तयार केले जाणारे युवा चेहरे |
Ans: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 21 नोव्हेंबर 2026 रोजी पुरुष क्रिकेटपटूंसाठी 2026-27 या हंगामाची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली.
Ans: मागील वर्षी 30 खेळाडूंचा समावेश होता. यंदा ही संख्या वाढवून जवळपास 38 खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये संधी देण्यात आली आहे.