पुना क्लब मॅजिशियन्स् संघाला विजेतेपद (फोटो- सोशल मिडिया)
एकेरीच्या सामन्यात विग्नेश संघवी याने सिध्दार्थ टेंभे याचा ४८-१८ असा पराभव करून पुना क्लबने २-० अशी आघाडी घेतली. डेक्कनच्या समर खंडेलवाल याने दिनेश मेहतानी याचा १५१-१०५ असा पराभव करून ही आघाडी १-२ अशी कमी केली. सुरज राठी याने डेक्कनच्या प्रशांत नातू याचा ७२-६१ असा पराभव करून पुना क्लब संघाला ३-१ अशी विजयी आघाडी मिळवून देत विजेतेपद मिळवले.
पीवायसी वॉरियर्स तृतीय स्थानी
तृतीय स्थानासाठीचा सामन्यामध्ये पीवायसी जिमखाना वॉरीयर्स संघाने डेक्कन जिमखाना मॉन्स्टर्स संघाचा ३-० असा सहज पराभव केला. विजेत्या पुना क्लब मॅजिशियन्स् संघ आणि उपविजेत्या डेक्कन जिमखाना ऐसेस संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन जिमखाना क्लबचे सरचिटणीस मिहीर केळकर, डेक्कन जिमखाना क्लबचे वित्तसचिव गिरीष इनामदार आणि व्योहरचे कार्यकारी संचालक गिरीष व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बिलीयर्डस् आणि स्नुकर संघटनेचे अध्यक्ष चिराग रामकृष्णन्, आयबीएसएफचे माजी अध्यक्ष राजन खिंवसरा आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संचालक समर खंडेलवाल यांनी तर, आभार बिलीयर्डस् आणि स्नुकर विभागाचे सचिव सतिश शाळीग्राम यांनी मानले.
जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
चुरशीच्या झालेल्या सामन्यात पुना क्लब मॅजिशियन्स् संघाने पीवायसी जिमखाना वॉरीयर्स संघाचा ३-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पुना क्लबच्या अनिश केअरिंग व अंगद सहानी यांचा आनंद आपटे व रोहीत नारगोलकर यांनी ४७-७० असा पराभव करून पीवायसीला विजयी सुरूवात करून दिली. विग्नेश संघवी याने पीवायसीच्या राजवर्धन जोशी याचा ३३-२२ असा आणि दिनेश मेहतानी याने आदित्य देशपांडे याचा १५०-८० असा पराभव करून पुना क्लबला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.






