(Photo - Social Media)
वाशिम आणि कारंजा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा कमाल दर ७ हजार ७८० रुपयांपर्यंत पोहोचला. तर सीड क्वालिटीच्या सोयाबीनला आठ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी घाई न करण्याची भूमिका घेतली आहे. आणखी दरवाढ होण्याच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी घरातच सोयाबीनचा साठा ठेवला आहे. यंदा उत्पादन कमी झाल्याने तसेच मागील हंगामातील शिल्लक साठ्यात घट झाल्याने बाजारात दर्जेदार सोयाबीनची उपलब्धता कमी आहे.
दुसरीकडे प्रक्रिया उद्योगांकडून सोयाबीनला मागणी वाढली आहे. सोयापेंड आणि खाद्यतेलाच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीचाही दरवाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी विविध कंपन्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने २०२६-२७ हंगामासाठी सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ७०८ रुपये प्रतिक्विंटल निश्चित केला आहे. मात्र, खुल्या बाजारात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा दोन हजार रुपयांहून अधिक वाढले आहेत.
विठोली खाजगीचे संचालक शेतकरी कृषी बाजार, अनिल चांडक म्हणाले की, सध्या सोयाबीन या शेतमालाला चांगला भाव मिळत असून शेतकरी हित लक्षात ठेवून बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला अधिकचा दर देण्याचा प्रयत्न करीत असून शेतक-यांनी आपला शेतमाल बाजारात विक्री करिता आणावा असे आवाहन यांनी केले आहे.
वाशिम बाजार समितीचे सचिव, वामनराव सोळंके म्हणाले की, जिल्ह्यातील शेतक-यांनी आपला शेतमाल बाजार समितीमध्येच आणावा सध्या शेतमालाचे भाव अधिक वाढत असल्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळेल आणि मोबदला सुद्धा त्वरित मिळेल यासाठी शेतक-यांनी शेतमाला वाशिम बाजार समितीमध्ये आणावा.
Ans: वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचा कमाल दर ८ हजार ५३९ रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे.
Ans: वाशिम, कारंजा, रिसोड आणि मानोरा या चारही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ८ हजार रुपयांहून अधिक दर मिळाला आहे.
Ans: दुष्काळामुळे उत्पादनात घट, बाजारातील कमी आवक आणि प्रक्रिया उद्योगांकडून वाढलेली मागणी यामुळे सोयाबीनचे दर वाढले आहेत.






