Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पृथ्वी शॉ मुंबई क्रिकेट संघ सोडणार? दुसऱ्या राज्याकडून खेळण्याची योजना! MCA कडून मागितली माफी

विश्वचषक विजेता कर्णधार पृथ्वी शॉ सध्या भारताच्या सर्वात प्रतिभावान तरुण खेळाडूंपैकी एक मानला जातो, परंतु तरीही त्याला भारतीय संघात संधी मिळत नाही. दरम्यान, बातम्यांनुसार, त्याने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 23, 2025 | 02:59 PM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

पृथ्वी शॉ मुंबई क्रिकेट संघ सोडण्याच्या इराद्यात :  भारताचा संघ सध्या इंग्लड दौऱ्यावर आहे, टीम इंडीया इंग्लडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना सध्या सुरु आहे. यामध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. याचदरम्यान आता भारतीय क्रिकेट संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता कर्णधार पृथ्वी शॉ सध्या भारताच्या सर्वात प्रतिभावान तरुण खेळाडूंपैकी एक मानला जातो, परंतु तरीही त्याला भारतीय संघात संधी मिळत नाही.

त्याला मागील बरीच वर्ष भारतीय संघामधुन त्याचबरोबर आयपीएल 2025 मध्ये देखील स्थान मिळाले नाही.  तो मुंबईच्या स्थानिक संघाबाहेर आहे. दरम्यान, बातम्यांनुसार, त्याने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आणखी २ ते ३ राज्य संघांसाठी खेळण्याची मोठी ऑफर मिळाली आहे. विक्री न झाल्यामुळे शॉ यावर्षी आयपीएलचा भाग नव्हता. 

ENG vs IND : Rishabh Pant आणि स्टंप माइक यांच जुनं नातं! उपकर्णधाराचा हा मजेदार व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला या वृत्ताची पुष्टी केली आणि सांगितले की, ‘पृथ्वी शॉने आमच्याकडून एनओसी मागितली आहे आणि आम्ही लवकरच त्यावर निर्णय घेणार आहोत.’ खराब तंदुरुस्तीमुळे, पृथ्वी शॉ मुंबईच्या विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी संघाचा भाग नाही. संघ व्यवस्थापनाने त्याला त्याच्या तंदुरुस्तीवर काम करण्याचा सल्ला दिला होता. वृत्तानुसार, शॉला २ ते ३ वेगवेगळ्या राज्यांच्या संघांकडून खेळण्याच्या ऑफर मिळाल्या आहेत. खराब तंदुरुस्तीमुळे तो भारतीय संघाबाहेरही होता. अलिकडच्या काळात, तो त्याच्या तंदुरुस्तीवर काम करताना दिसला आहे.

🚨 SHAW WANTS TO LEAVE MUMBAI. 🚨 – Prithvi Shaw seeks NOC from Mumbai as he wants to play for another state team. (Express Sports). pic.twitter.com/z5OyuBhIlO — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 23, 2025

अलिकडेच पृथ्वी शॉ मुंबई टी-२० लीगमध्ये खेळताना दिसला. जिथे त्याने कर्णधार म्हणूनही शानदार खेळी केली. आयुष म्हात्रे आणि यशस्वी जयस्वाल यांच्याव्यतिरिक्त आता मुंबई संघात सलामी फलंदाजीसाठी अंगकृष रघुवंशीचा पर्यायही आहे. त्यामुळे शॉला खेळण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत, आता पृथ्वी शॉला विश्वास आहे की त्याला दुसऱ्या राज्याच्या संघात खेळण्याची संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत, तो आता त्याच्या कारकिर्दीत पुढे जाऊ इच्छितो.

Web Title: Prithvi shaw to leave mumbai cricket team apologizes to mca

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Prithvi Shaw
  • Team India
  • Vijay Hazare Trophy

संबंधित बातम्या

IND vs PAK : यांच्या कॉन्फिडन्सची दाद द्यायला हवी…11 सामने गमावल्यानंतरही विजयाचे स्वप्न पाहतेय पाकिस्तानी कर्णधार
1

IND vs PAK : यांच्या कॉन्फिडन्सची दाद द्यायला हवी…11 सामने गमावल्यानंतरही विजयाचे स्वप्न पाहतेय पाकिस्तानी कर्णधार

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित
2

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

IND vs PAK Weather Report : भारत पाक सामना रद्द होणार? जाणून घ्या कोलंबोमधील हवामानाची स्थिती
3

IND vs PAK Weather Report : भारत पाक सामना रद्द होणार? जाणून घ्या कोलंबोमधील हवामानाची स्थिती

Team India New Captain : भारतीय ODI संघाची कमान मिळाल्यानंतर शुभमन गिलची पहिली रिॲक्शन! विश्वचषकावरही केले एक मोठे विधान
4

Team India New Captain : भारतीय ODI संघाची कमान मिळाल्यानंतर शुभमन गिलची पहिली रिॲक्शन! विश्वचषकावरही केले एक मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.