फोटो सौजन्य – X (JioHostar)
ऋषभ पंत मजेदार व्हिडिओ : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना सुरू आहे, या सामन्यात टीम इंडियाने तिसऱ्या डावामध्ये फलंदाजीला सुरुवात केली आहे. पहिल्या डावांमध्ये भारताचे तीन शतकवीर ठरले यामध्ये ऋषभ पंत, शुभमन गिल आणि आणि यशस्वी जयस्वाल या तीन खेळाडूंनी कमालीचा खेळ दाखवला आहे. ऋषभ पंत आणि स्टम्प माईक या दोघांचा फार जुना नव्हता आहे. भूतकाळामध्ये देखील अनेकदा ऋषभ पंतचे स्टंट माईकमधील कॉन्व्हर्सेशन हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले होते.
कालच्या दिनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रिषभ पंत हा पंचांवर संतापलेला दिसला त्यात नंतर त्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामन्याचे आयोजन हे लीड्समध्ये करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, टीम इंडियाची एकूण आघाडी 96 धावांवर पोहोचली आहे. दुसऱ्या डावात, भारतीय संघाने 2 विकेट गमावल्यानंतर स्कोअरबोर्डवर 90 धावा केल्या आहेत. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर बरेच काही घडले. ऋषभ पंत त्याच्या वागण्यामुळे चर्चेत होता. पंत पंचांशी भांडताना दिसला, तर कधीकधी त्याची विनोदी शैली देखील पाहायला मिळाली.
विकेटकीपर फलंदाजाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो कीपिंग करताना जडेजासोबत मजा करताना दिसत आहे. रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता आणि बेन डकेट स्ट्राईकवर होता. जड्डूच्या एका चेंडूवर डकेटने रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो तो पूर्णपणे चुकला. जडेजाचा चेंडू लेग स्टंपच्या खूप बाहेर होता, ज्यामुळे पंतला चेंडू पकडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पंत चेंडू पकडण्यात यशस्वी झाला, पण त्यानंतर त्याने जे सांगितले ते ऐकून सर्वांना हसू आले. पंत जडेजाला म्हणाला, “मीही खेळत आहे भाऊ. तुमच्या चौकारांच्या मागे धावताना मला चौकार देऊ नकोस.”
.@RishabhPant17 + @ShubmanGill = Absolute cinema! ✨
These two don’t play the game, they put on a show! 🍿#ENGvIND 👉 1st TEST, Day 3 | SUN, 22nd JUNE, 2:30 PM Streaming On JioHotstar! pic.twitter.com/ZQHkO5QGjv
— Star Sports (@StarSportsIndia) June 21, 2025
भारताच्या संघाने मोठी धावसंख्या उभारली होती पण टीम इंडीया ही या धावसंख्येला डीफेंड करु शकली नाही. आज सामन्याचा चौथा दिवस असणार आहे. यामध्ये भारताचा संघ फलंदाजी करत आहे.