फोटो सौजन्य - सोशल मीडिया
प्रो कब्बडी लीग २०२४ : प्रो कब्बडी लीग २०२४ चा शुभारंभ काल म्हणजेच १८ ऑक्टोबर रोजी करण्यात आला आहे. यामध्ये कालच्या दिनी दोन सामने खेळवण्यात आले. पहिला सामना तेलगू टायटन्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स यांच्यामध्ये रंगला होता. सुरुवातीपासूनच तेलगू टायटन्सचा दबदबा पाहायला मिळाला. प्रो कब्बडी लीगचे दोन दिग्गज खेळाडूं पवन सेहरावत आणि प्रदीप नरवाल हे एकमेकांविरोधात भिडताना दिसले. तर दुसरा सामना दबंग दिल्ली विरुद्ध यु मुंबा यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्यत दबंग दिल्लीच्या संघाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. आज पुन्हा पवन सेहरावतचा संघ आज पुन्हा मॅटवर असणार आहे. आज त्यांचा सामना तमिळ थलायवासशी होणार आहे. प्रो कब्बडी लीग २०२४ च्या दुसऱ्या दिनी तेलगू टायटन्स विरुद्ध तमिळ थलायवास यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना पुणेरी पलटण विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यामध्ये रंगणार आहे.
Last season’s finalists ready to face off in #PKL11 🔥
Watch Puneri Paltan 🆚 Haryana Steelers 👉 Follow LIVE updates on https://t.co/cfORnVakqn or download the Pro Kabaddi Official App 📱#PuneriPaltan #HaryanaSteelers #ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar pic.twitter.com/jyiziXF7d5
— ProKabaddi (@ProKabaddi) October 19, 2024
तेलगू टायटन्स विरुद्ध तमिळ थलायवास हा सामना संध्याकाळी ८ वाजता पाहता येणार आहे. तर पुणेरी पलटण विरुद्ध हरियाणा स्टीलर्स या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि हा सामना ९ वाजता सुरु होणार आहे. प्रो कब्बडी लीग २०२४ चे सर्वच संघ दमदार तयारी करून आले आहेत.
तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायवास यांच्यातील प्रो कब्बडी लीगमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये तमिळ थलायवासचा हात पूर्णपणे वरचढ होता. दोन्ही संघ आपापसात एकूण १४ सामने खेळले आहेत. या कालावधीत थलायवासने ८ सामने जिंकले असून तेलुगू टायटन्सने केवळ ५ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील एक सामना बरोबरीत सुटला. हे आकडे पाहता, असे म्हणता येईल की तेलुगू टायटन्सविरुद्ध तामिळ थलैवाचा वरचष्मा आहे.
A sizzling 𝐒𝐨𝐮𝐭𝐡𝐞𝐫𝐧 𝐃𝐞𝐫𝐛𝐲 ♨️
Catch Titans 🆚 Thalaivas in action tonight 👉 Follow LIVE updates from the match on https://t.co/cfORnVakqn or download the Pro Kabaddi Official App 📱#TeluguTitans #TamilThalaivas #ProKabaddi #PKL11 #ProKabaddiOnStar #LetsKabaddi pic.twitter.com/8AeWhDle7f
— ProKabaddi (@ProKabaddi) October 19, 2024
प्रो कब्बडी लीगमधील पुणेरी पलटण आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यात आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये पुणेरी पलटणचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध एकूण १५ सामने खेळले आहेत. या कालावधीत पुणेरी पलटणने ९ सामने जिंकले असून हरियाणाने केवळ ५ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील एक सामना बरोबरीत सुटला. ही आकडेवारी पाहता, हरियाणा स्टीलर्सविरुद्ध पुणेरी पलटणचा वरचष्मा आहे, असे म्हणता येईल.