PSL 2025: IPL poor compared to Pakistan Super League? Pakistan cricket is earning more money, read in detail..
PSL 2025 : सध्या भारतात आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा थरार रंगला आहे. तर, पाकिस्तानमध्ये देखील पीएसएल स्पर्धेचा थरार सूरु आहे. दोन्ही देशांमध्ये मागे पुढे या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. भारतात आयपीएल सुरू झाली त्यानंतर पाकिस्तानमध्ये पीएसएलची सुरवात करण्यात आली आहे. सध्या, पाकिस्तानमधील लोक पीएसएलची तुलना जगातील सर्वात मोठ्या लीग आयपीएलशी करत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे, जगातील अव्वल क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळतात, तर दुसरीकडे, आयपीएलमधून न विकले गेलेले खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसून येतात. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास डेव्हिड वॉर्नर याचे नाव घेता येईल. तो पीएसएलमध्ये कराची किंग्जचा कर्णधार आहे.
तसेच आयपीएलमध्ये संघ खेळाडूंवर खूप पैसे खर्च करत असतात, तर पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्यातील १० टक्केही रक्कम खेळाडूंवर खर्च होताना दिसत नाही. असे असून देखील आता काही पाकिस्तानी चाहते बोलताना दिसत आहे की, तिथ जास्त रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. या संदर्भात, पाकिस्तानी चाहते सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांना डिवचत आहेत. या मागील सत्य नेमके काय? ते आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : DC vs RR : संदीप शर्माच्या नावे कुणालाही नकोसा वाटेल असा विक्रम, लाजिरवाण्या यादीत झाला सामील..
पाकिस्तानी चाहते सोशल मीडियावर दावा करताना दिसत आहे की, पाकिस्तानमध्ये सामनावीराच्या बक्षिसाची रक्कम भारतापेक्षा जास्त आहे. आता तुम्हाला हे वाचून प्रश्न पडला असेल की पाकिस्तानी चाहते जे म्हणतात ते खरे आहे का? वास्तवात, पाकिस्तानमध्ये सामनावीराची रक्कम १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असते. त्याच वेळी, भारतात आयपीएलमध्ये सामनावीराची रक्कम १ लाख रुपये आहे. याच एका कारणाने पाकिस्तानी चाहते सोशल मीडियावर भारताला ट्रोल करत आहेत. परंतु, त्यांना भारतीय रुपया आणि भारत आणि पाकिस्तानचा पाकिस्तानी रुपया यातील नेमका फरक माहित नसल्याने त्यांचे ही अज्ञान दिसून येत आहे.
हेही वाचा : IPL २०२५ : Rishabh Pant सेनेसाठी आनंदाची बातमी! एलएसजी संघात ‘या’ तेजतर्रार गोलंदाजाची एंट्री! पहा VIDEO
पाकिस्तान आणि भारताच्या रुपयांमध्ये खूप मोठी तफावत आहे. १७ मार्च २०२५ च्या ताज्या अहवालानुसार, भारताचा एक रुपया हा पाकिस्तानच्या ३.२१ रुपयांच्या बरोबरीचा आहे. आता अशा परिस्थितीत, पाकिस्तानी चाहत्यांचे दावे कितीही मोठे असले तरी, त्यांची लीग आयपीएलसमोर कुठेच टिकाव धरू शकत नाही. जर आपण बक्षिसाच्या रकमेबद्दल सांगायचे झाल्यास इथेही खूप मोठा फरक दिसून येतो. आयपीएलच्या विजेतेपदाची बक्षीस रक्कम २० कोटी रुपये आहे, तर पीएसएलची १३ कोटी रुपये आहे.