मयंक यादव(फोटो-सोशल मिडिया)
IPL २०२५ : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत ३२ सामने खेळवण्यात आले आहेत. संघा-संघामध्ये गुणतालिकतेही मोठी स्पर्धा बघायाल मिळत आहे. आयपीएल २०२५ मध्ये लागोपाठ ५ पराभव पचवलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला सोमवारी झालेल्या लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या विजय मिळाला. लखनौच्या घरच्या मैदानावरच चेन्नईने त्यांना पराभूत केले. कर्णधार रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौने २० षटकांत १६६ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने हे लक्ष्य १९.३ षटकांत ५ गडी राखून पूर्ण केले. चेन्नईच्या या विजयाने लखनौची विजयी दौडघौड थांबली. पण, आता एलएसजी संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. तब्बल ११ कोटींना संघात कायम ठेवण्यात आलेला वेगवान गोलंदाज मयंक यादव आता पुन्हा संघात परतणार आहे.
लखनौ सुपर जायंट्स संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. जलद गोलंदाज मयंक यादवचा संघात समावेश झाला आहे. २२ वर्षीय हा वेगवान गोलंदाज शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात उपलब्ध असण्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे. आहे. एलएसजीने त्यांच्या सोशल मीडियावर एका खास व्हिडिओ शेयर करन मयंकच्या पुनरागमनाची घोषणा केलीय आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मयंक यादव परत आला आहे.”
हेही वाचा : Shiv Chhatrapati State Sports Awards : शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव, तर ऋतुराज गायकवाडही होणार सन्मानित..
मयंक यादव आयपीएल २०२५ मधून पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. या हंगामाच्या सुरुवातीला तो परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु त्याच्या पायाच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे संसर्ग वाढला आणि त्याचे पुनरागमन आणखी लांबत गेले. मागील वर्षी यादव बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर तीन टी-२० सामन्यांमध्ये खेळला होता. त्यामुळे तो संपूर्ण स्थानिक हंगामात खेळू शकला नाही. त्यानंतर तो बेंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसनासाठी गेला होता.
हेही वाचा : DC vs RR : संदीप शर्माच्या नावे कुणालाही नकोसा वाटेल असा विक्रम, लाजिरवाण्या यादीत झाला सामील..
एलएसजीचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर मयंकच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे खुश दिसून आले. ते म्हणाले की, “मयंक सध्या खेळत आहे, जे भारतीय क्रिकेट आणि आयपीएलसाठी खरोखरच खूपच चांगले आहे. काल मी एनसीएमध्ये त्याचा गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ पाहिला. तो सुमारे ९० ते ९५% वेगाने गोलंदाजी करत होता.”
मागीळ हंगामात मयंकने त्याच्या वेगवान गतीने आणि विकेट घेण्याच्या क्षमतेने आयपीएलमध्ये दहशत माजवली होती. त्याने सातत्याने १५० किमी/ताशीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली होती. गेल्या हंगामात तो एलएसजीसाठी फक्त चार सामने खेळू शकला होता.