Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MotoJunior World Championship स्पर्धेत पुण्याचा सार्थक चव्हाण होणार सहभागी; ‘टॉप फाईव्ह‌’मध्ये येण्याचे लक्ष्य

जुन महिन्यांमध्ये झालेल्या या स्पर्धांच्या पहिल्या आणि दुसऱ्या शर्यतीमध्ये सार्थक याची कामगिरी त्याच्या नावलौकिकासारखी होऊ शकली नव्हती. परंतु सार्थकने हे अपयश पचवून स्पेनच्या शर्यतीनमध्ये अव्वल कामगिरी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 24, 2026 | 09:29 PM
MotoJunior World Championship स्पर्धेत पुण्याचा सार्थक चव्हाण होणार सहभागी; ‘टॉप फाईव्ह‌’मध्ये येण्याचे लक्ष्य
Follow Us
Follow Us:
  • मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सार्थक चव्हाण सहभागी
  •  ‘क्लिन्ट ज्युनिअर टिम दा कोर्सा‌’ या संघाकडून सार्थक रेसिंग करणार 
  • गेल्या शर्यतीमध्ये सार्थक चव्हाणने ठेवले होते  ‘टॉप टेन‌’ हे उद्दीष्ट्य 
पुणे: फ्रान्स्‌मधील ‘सर्किट-द-नेव्हेर्स मॅग्नी-कूर्स‌’ येथे ‘एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद‌’ स्पर्धेच्या हंगामातील चौथी शर्यत रविवार, २६ जुलै २०२६ रोजी होणार असून, या शर्यतीमध्ये भारतीय रेसर पुण्यातील (Sports) सार्थक चव्हाण सहभागी होत आहे. ‘स्टॉक युरोपियन चॅम्पियनशीप‌’ या गटामध्ये सार्थक आपले कौशल्य पणाला लावणार असून. ‘क्लिन्ट ज्युनिअर टिम दा कोर्सा‌’ या संघाकडून सार्थक रेसिंग करणार आहे.

स्पनेमध्ये ५ जुलै रोजी झालेल्या तिसऱ्या शर्यतीमध्ये सार्थक याने अफलातुन कामगिरी करून सहावा क्रमांक मिळवून इतिहास घडविला. ‘जीपीस्टॉक युरोपियन चॅम्पियनशीप‌’ या गटामध्ये पहिल्यांदाच एखादा भारतीय रेसर पहिल्या सहा क्रमांकावर पोहचू शकला आहे. याआधी मे आणि जुन महिन्यांमध्ये झालेल्या या स्पर्धांच्या पहिल्या आणि दुसऱ्या शर्यतीमध्ये सार्थक याची कामगिरी त्याच्या नावलौकिकासारखी होऊ शकली नव्हती. परंतु सार्थकने हे अपयश पचवून स्पेनच्या शर्यतीनमध्ये अव्वल कामगिरी केली.

Pune News: पार्थ सोनारच्या भेदक गोलंदाजीची कमाल! पुणे फ्युचर स्टार्सचा ४ गडी राखून दणदणीत विजय

या स्पर्धेच्या चौथ्याफेरीपुर्वी बोलताना सार्थक म्हणाला की, गेल्या शर्यतीमध्ये मी ‘टॉप टेन‌’ हे उद्दीष्ट्य ठेवले होते आणि यामध्ये यश मिळवून मी सहावा क्रमांक पटकावला होता. यावेळी माझे लक्ष्य हे ‘टॉप फाईव्ह‌’ मध्ये येण्याचे आहे. पहिल्या व दुसऱ्या फेरीमध्ये झालेल्या गोष्टींच्या अनुभवातून मला खुप काही शिकायला मिळाले. अपयशातूनच सर्वोत्तम प्रदर्शन करण्याची मला उर्जा मिळाली होती आणि त्या जोरावरच मी टॉप-टेन स्पर्धकांमध्ये पोहचू शकलो. आता यापेक्षा अधिक जास्त जोमाने मला कामगिरी करायची आहे. या शर्यती दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसामध्ये ही शर्यत अधिक आव्हानात्मक होते.

क्रिकेटविश्वात प्रचंड मोठी खळबळ! Pakistan विरुद्ध खेळण्यास ‘या’ खेळाडूचा स्पष्ट नकार; हेड कोच म्हणाले…

डीओसी पुणे, लेगसी मोटर्स, केवायटी हेल्मेट्स, एच.ओ.एम. आणि प्लनेट डीएसजी यांनी सार्थकला पाठींबा दिला असून सपोर्ट करत आहे. पुण्यातील उद्योजक शशांक गुप्ता आणि मेहुल छेडा यांनी या रेससाठी सार्थकला पाठींबा दिला आहे. ‘पुणे कार्टड्रोम’ येथे सार्थक आपल्या शर्यतीसाठीचा सराव करतो. तसेच सार्थक साई जीमचे चेतन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फिटनेस‌’ सराव करत आहे. सार्थकला प्रशिक्षक अमोद तळपदे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Web Title: Pune sarthak chavan participates in the motojunior world championship 26 july 2026 in france

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • France
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Pune Prabhag Samiti: पुणे पालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी चुरस! ४५ जागांसाठी २९८ अर्ज
1

Pune Prabhag Samiti: पुणे पालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी चुरस! ४५ जागांसाठी २९८ अर्ज

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं
2

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव
3

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव

Eiffel Tower Controversy : अन् पॅरिस पेटलं ;आयफेल टॉवरवर ‘लेडीज फर्स्ट’चा वाद
4

Eiffel Tower Controversy : अन् पॅरिस पेटलं ;आयफेल टॉवरवर ‘लेडीज फर्स्ट’चा वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.