
अन्वय द्रविडने केली 151 रन्सची तुफानी खेळी
गुजरात संघाने कर्नाटकच्या संघासमोर विजयासाठी तब्बल 358 रन्सचे टार्गेट ठेवले होते. मात्र या टार्गेटचा पाठलाग करताना कर्नाटकचा कर्णधार अन्वय द्रविडने आक्रमक खेळी आणि तुफानी खेळी केली आहे. द्रविडने 100 बॉलमध्ये थेट 151 रन्सची खेळी केली आहे. त्यामुळे कर्नाटकने सामना सहज जिंकला आहे.
कर्नाटक संघाने विशाखापट्टनम येथे सुरू असलेल्या ‘वीणू मांकड ट्रॉफी’मध्ये आपले शानदार प्रदर्शन सुरूच ठेवले आहे. कर्णधार अन्वय द्रविडच्या खेळीने कर्नाटकने शानदार विजय ठरवला आहे. डावाच्या ३८ व्या ओव्हरमध्ये ध्रुव कृष्ण बाद झाल्यानंतर, कर्णधार अन्वय द्रविडने अनिकेत रेड्डीसोबत मोर्चा सांभाळत चौथ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण ६१ धावांची पार्टनरशिप केली. अन्वयने संपूर्ण डावात संयमी मात्र आक्रमक खेळी केली. अनिकेत रेड्डी आणि तेजस रेड्डी यांनी 358 रन्सचे टार्गेट पूर्ण करून कर्नाटकला शानदार विजय प्राप्त करून दिला.
IND Vs NZ: ‘किवीं’चा खेळ खल्लास! न्यूझीलंडविरुद्ध ODI संघ जाहीर, मात्र कर्णधारच बदलला, आता…
विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कर्नाटक संघाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. डावाच्या सुरुवातीला रोहित रेड्डी आणि नीतीश आर्य यांनी पहिल्या विकेटसाठी ३० रन्स केल्या. त्यानंतर रोहित ध्रुव कृष्ण यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३३ रन्सची पार्टनरशिप केली. त्यानंतर मात्र कर्णधार अन्वय द्रविडने एका बाजूने मोर्चा सांभाळला.
आर्यवीरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा
भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग, नुकताच ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध भारतीय १९ वर्षांखालील संघाकडून खेळला. त्या मालिकेत त्याला मोठी खेळी करता आली नसली तरी, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) आता त्याच्यावर एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. विनू मांकड ट्रॉफीसाठी दिल्लीच्या १९ वर्षांखालील पुरुष संघाचा कर्णधार म्हणून आर्यवीर सेहवागची नियुक्ती करण्यात आली आहे. डीडीसीएने संघाची घोषणा देखील केली आहे.