Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB विजेतेपदाचा प्रमुख दावेदार, ‘पुढच्या 2 वर्षांत आणखी 2 ट्रॉफी!’, CSK च्या माजी खेळाडूचं विधान

RCB साठी २०२६ चा IPL हंगाम स्पेशल ठरणार आहे. नव्या आशांसह आणि 'विद्यमान विजेते'असल्यामुळे विशेष सन्मानासह हा हंगाम सुरू होत आहे. यातच CSK च्या माजी खेळाडूने यातच मोठं विधान केलं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 21, 2026 | 02:24 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • CSK च्या माजी खेळाडूने यातच मोठं विधान
  • RCB आणखी २ ट्रॉफी जिंकणार
  • मेगा लिलावानंतर RCB चे नशीब पालटले
2 More Trophies In Next 2 Years  : IPL 2026 चे वारे सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सुरु झाले आहेत. सगळ्या टीमसाठी हा हंगाम स्पेशल असणार आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) साठी २०२६ चा IPL हंगाम स्पेशल ठरणार आहे. नव्या आशांसह आणि ‘विद्यमान विजेते’ (defending champions) असल्यामुळे विशेष सन्मानासह हा हंगाम सुरू होत आहे. यातच CSK च्या माजी खेळाडूने यातच मोठं विधान केलं आहे. काय आहे हे नेमकं भाकीत?

IPL 2026 पूर्वी BCCI ने दोन सामन्यांचे शेड्युल केलं जाहीर, कोणते संघ येणार आमनेसामने?

अनुभवी फिरकी गोलंदाजाचं मोठं विधान

अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने RCB बाबत एक मोठं भाकीत केलं आहे. हा तोच संघ आहे ज्याने १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आपला पहिलेवहिला विजेतेपद कप जिंकला आहे. अश्विनचा असा विश्वास आहे की, RCB ची सध्याची संघरचना इतकी बॅलंस आहे की, पुढील दोन वर्षांत ते आपल्या नावावर आणखी दोन विजेतेपदं जमा करू शकतात.

RCB वर अश्विनचा विश्वास

YouTube वाहिनीवर बोलताना, अश्विनने RCB च्या या नवीन आणि बॅलंज संघाबाबत भरभरून कौतुक केले. अश्विन म्हणाला, “या संघासह, RCB पुढील दोन वर्षांत आपल्या विजेतेपदांच्या यादीत आणखी एका विजेतेपदाची भर घालू शकते. IPL जिंकणे ही काही सोपी गोष्ट नाही; परंतु या संघाकडे असलेले भक्कम पायाभूत रचना आहे. प्रत्येक स्थानासाठी या संघाकडे तितकेच सक्षम पर्याय (like-for-like replacements) आहेत. जे त्या जागेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांनी त्यांच्या बँटिंग ऑर्डरमधील उणीवा नव्या खेळाडूंनी भरुन काढल्या आहेत. ज्यामुळे हा संघ आता अत्यंत बलाढ्य, मजबूत आणि गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांमध्ये स्थान मिळवण्यास सक्षम दावेदार बनला आहे. “

मेगा लिलावानंतर RCB चे नशीब पालटले

IPL २०२४ नंतर, RCB ने केवळ विराट कोहली, यश दयाल आणि रजत पाटीदार यांनाच संघात कायम (Retain) ठेवण्याचा एक मोठा धोका पत्करला. मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मुक्त केल्यानंतर, २०२५ च्या मेगा लिलावादरम्यान संघात मोठे बदल करण्यात आले. फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवुड, टीम डेव्हिड आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या खेळाडूंच्या आगमनामुळे संघाला समतोल मिळाला. ज्यामुळे त्यांना मागील हंगामात विजेतेपदाचा माजलेला दुष्काळ संपवण्यात यश आलं.

हेझलवुडच्या दुखापतीमुळे चिंतेचे वातावरण

RCB आपल्या मोहिमेची सुरुवात २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध करणार आहे; मात्र, जोश हेझलवुडच्या सामना खेळणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. हेझलवुड सध्या दुखापतीतून सावरत असून, त्याला सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. त्याचा परिणास संघावर नक्कीच होणार आहे. पण अश्विन मात्र या परिस्थितीकडे RCB साठी एक ‘छुपं वरदाना’मानतो. तो म्हणाला, “जर हेझलवुड उपलब्ध नसेल, तर RCB फिल सॉल्ट आणि जेकब बेथेल या दोघांनाही संघात स्थान देऊ शकते. हेझलवुड संघात परत येईपर्यंत, संघाची स्थिती आणखीनच स्पष्ट झालेली असेल.”

‘इम्पॅक्ट प्लेयर’, मेंटर की …! CSK टीममध्ये MS Dhoni ची भूमिका काय असेल? Sanju Samson च्या एन्ट्रीने बदलली समीकरणं?

Web Title: Rcb a leading contender for the title2 more trophiescsks chief strategist makes a bold statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • CSK
  • IPL
  • IPL 2026
  • R Ashwin
  • RCB
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
1

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी
2

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.