Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 Playoffs: असं कुठं असतंय व्हय? जागा एक अन् दावेदार अनेक; SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ

यंदाच्या हंगामात आरसीबीने सर्वात पहिल्यांदा क्वालिफाय केले आहे. आरसीबीचा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यामुळे त्यांच्या ट्रॉफी जिंकण्याची आशा वाढली आहे. काल एसआरएच विरुद्ध चेन्नईचा दारुण पराभव केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 19, 2026 | 04:11 PM
IPL 2026 Playoffs: असं कुठं असतंय व्हय? जागा एक अन् दावेदार अनेक; SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ
Follow Us
Follow Us:

प्ले ऑफच्या चौथ्या स्थानासाठी चुरस वाढली 
एसआरएचने गुजरातचे तिकीट देखील केले निश्चित 
आज राजस्थान रॉयल्स अन् लखनौ भिडणार

Tata IPL 2026 Playoff Scenarios: आयपीएलचा थरार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. साखळी सामन्यांचा हा शेवटचा आठवडा असणार आहे. पुढील आठवड्यात प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. मात्र अद्याप एका जागेवर कोणता संघ प्ले ऑफमध्ये जाणार याबाबत निश्चित झालेली नाही. आतापर्यंत गुजरात, आरसीबी आणि एसआरएचच्या संघाने क्वालिफाय केले आहे. कालच्या एसआरएचच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत.

यंदाच्या हंगामात आरसीबीने सर्वात पहिल्यांदा क्वालिफाय केले आहे. आरसीबीचा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यामुळे त्यांच्या ट्रॉफी जिंकण्याची आशा वाढली आहे. काल एसआरएच विरुद्ध चेन्नईचा दारुण पराभव केला आहे. या विजयामुळे केवळ हैदराबादने आपले प्लेऑफचे तिकीट पक्के केले नाही, तर पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ केली आहे.

हैदराबादने चेन्नईला धूळ चारली. याचा फायदा गुजरात टायटन्सचा फायदा झाला आहे.  हैदराबादच्या या विजयामुळे गुजरातचा अंतिम चारमध्ये पोहोचण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला. दुसरीकडे चेन्नईच्या संघाचा अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना आता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

Tamilnadu मध्ये सरकार बदललं! आता CSK चा विजय नक्की? पहा ‘ते’ खास राजकीय कनेक्शन

आरसीबीचे सध्या 18 पॉईंट्स झाले आहेत. तसेच एसआरएचकडे आणि गुजरातकडे 16 पॉईंट्स जमा झाले आहेत. आता मात्र प्ले ऑफ साठी एकच जागा शिल्लक आहे. त्यामुळे यासाठी अनेक संघांमध्ये चुरस सुरू आहे. आरसीबी, गुजरात आणि एसआरएचने प्लेऑफ मध्ये क्वालिफाय केले आहे.  आता उरलेल्या एका जागेसाठी पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ मैदानात आहेत. या सर्व संघांना आपले पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यातूनच प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानावर कोण क्वालिफाय होणार हे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये समजणार आहे.

आता CSK चा विजय नक्की? पहा ‘ते’ खास राजकीय कनेक्शन

आयपीएलच्या इतिहासात एक पॅटर्न दिसून आला आहे. जो एक योगायोग म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. जेव्हा- जेव्हा तामिळनाडूमध्ये सरकार बदलले जाते, तेव्हा तेव्हा आयपीएलची ट्रॉफी चेन्नई सुपर किंग्सने उंचावली असल्याचे पाहायला मिळाले आहे.तामिळनाडूमध्ये 2011 मध्ये सत्ताबदल झाला होता. त्यावर्षी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तसेच 2021 मध्ये देखील तामिळनाडू राज्यात सरकार बदलले होते आणि योगायोगाने त्याच वर्षी दुबईत झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नईने ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.

Playoffs Scenarios: ‘असे’ घडले तर RCB जाणार प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? धक्कादायक समीकरण उडवेल झोप

2026 मध्ये पुनरावृत्ती होणार?

2011 आणि 2021 मध्ये तामिळनाडूमधील सत्ताबदल आणि चेन्नईने जिंकलेली ट्रॉफी असा योगायोग जुळून यंदा 2026 मध्ये येणार का? हे पहावे लागणार आहे. 2026 मध्ये तामिळनाडूमध्ये सरकार बदलले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा आशा पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: Rcb gt and srh qualify in tata ipl 2026 fight bewwen rr kkr dc pks for top 4 position

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • Sunrisers Hyderabad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.