RCB vs KKR: A thrilling encounter between Bengaluru and Kolkata today! Know A to Z information about the match..
RCB vs KKR : बीसीसीआयकडून एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेले आयपीएल २०२५ आजपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. या हंगामातील ५८ वा सामना १७ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. पुन्हा एकदा चाहत्यांना क्रिकेटचा आनंद लुटता येणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आजपासून पुन्हा खेळवले जाणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स विजयासह आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आरसीबीने आतापर्यंत 11 सामने खेळले आहे, यामध्ये त्यांनी ८ सामन्यात विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तर केकेआर संघ १२ सामन्यांत ६ विजयांसह सहाव्या स्थानावर विराजमान आहे. अशा परिस्थितीत, आता कोलकाताला आजचा सामना करो अथवा मरो असा असणार आहे.
चिन्नास्वामी स्टेडियमला फलंदाजांसाठी पोषक आहे. कारण, येथे सीमा रेषा लहानया आहे आणि चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येतो. ज्यामुळे फलंदाजांना फटके मारने सोपे होते. केकेआर आणि आरसीबी यांच्यात एक हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या मैदानावर गेल्या सामन्यात बेंगळुरूने २१३ धावा केल्या होत्या. चेन्नई संघानेही २११ धावा उभारल्या होत्या. आशा आहे की हा सामनाही मोठ्या धावा होऊ शकतात.
शनिवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. आर्द्रता ७५% असेल आणि पावसाची शक्यता ५६% आहे, हवामान ढगाळ राहण्याची आणि जोरदार गडगडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत किती षटके खेळवता येतील हे पाहणे रंजक असणार आहे.
दोन्ही संघांमध्ये एकूण ३५ सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये केकेआरने २० सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने १५ सामने आपल्या नावे केले आहेत. आरसीबी संघ हा आकडा सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा : Doha Diamond League 2025 : अखेर Neeraj Chopra चा थ्रो ९० मीटर पार! दोहा डायमंड लीगमध्ये रचला इतिहास..
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य खेळी 11 : फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, रसिक सलाम/लुंगी एनगिडी, यश दयाल
कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य खेळत 11 : सुनील नारायण, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे/व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, वैभव चर्बोरा, अनुकुल रॉय