Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs PBKS : ‘किंग’ Kohli चा नवा रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

Virat Kohli 500 Runs in IPL 2026: विराट कोहलीने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात एका नवा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 17, 2026 | 06:01 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • किंग कोहलीने इतिहास रचला
  • ९व्यांदा गाठला ५०० चा टप्पा
  • कोहलीची किंग्सविरुद्ध तूफानी फलंदाजी
आयपीएल २०२६ मध्ये विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. कोहली आयपीएलमध्ये एका पाठोपाठ अनेक विक्रम रचत आहे. हंगामातील ६१ वा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात शानदार फलंदाजी करत कोहलीने आणखी एक नवीन विक्रम केला आहे. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पंजाबविरुद्धच्या सामन्यात षटकार मारून इतिहास रचला आहे. कोहली आयपीएलच्या इतिहासात एकाच फ्रँचायझीकडून सलामीवीर म्हणून ५५०० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. आजपर्यंत आयपीएलमध्ये एकाच फ्रँचायझीकडून खेळताना कोणत्याही फलंदाजाने ही कामगिरी केलेली नाही.

RCB Vs PBKS: धुरळाच! Venky च्या वादळी खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार? किंग्जला 223 रन्सची गरज

किंग कोहलीने इतिहास रचला

विराट कोहलीने आयपीएलच्या ९ हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वाधिक हंगामांमध्ये ५०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर आहे. या यादीत डेव्हिड वॉर्नर आणि केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहेत, या दोघांनीही सात वेळा ५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने आयपीएल २०२६ मध्ये १३ डावांत ५४२ धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएल २०२६ मध्ये त्याने आतापर्यंत १६४.७४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे.रविवारी पंजाब किंग्सविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावून त्याने पुन्हा एकदा आपल्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने तीन चौकार आणि तितक्याच षटकारांच्या मदतीने अवघ्या ३१ चेंडूंमध्ये हे अर्धशतक पूर्ण केले.

९ व्यांदा गाठला ५०० चा टप्पा

  • आयपीएल २०११ – ५५७ धावा
  • आयपीएल २०१३ – ६३४ धावा
  • आयपीएल २०१५ – ५०५ धावा
  • आयपीएल २०१६ – ९७३ धावा
  • आयपीएल २०१८ – ५३० धावा
  • आयपीएल २०२३ – ६३९ धावा
  • आयपीएल २०२४ – ७४१ धावा
  • आयपीएल २०२५ – ६५७ धावा
  • आयपीएल २०२६, – ५४२+धावा, आतापर्यंत

वयाच्या ३५ वर्षांनंतर एका हंगामात ५०० पेक्षा जास्त धावा

  • विराट कोहली- ३
  • सचिन तेंडुलकर- २
  • फाफ डू प्लेसिस- २

कोहलीची किंग्सविरुद्ध तूफानी फलंदाजी

कोहलीने पंजाब किंग्सविरुद्ध नेहमीच शानदार फलंदाजी केली आहे. या सामन्यादरम्यान, त्याने पंजाबविरुद्ध आपल्या आयपीएल कारकिर्दीत १२१७ धावा पूर्ण केल्या, जो एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. पंजाब व्यतिरिक्त, विराटने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ११७४ आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ११७२ धावा देखील केल्या आहेत.

IPL 2026: KKR च्या विजयाने प्लेऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, बदलले पॉईंट टेबलचे गणित; टॉप-4 साठी चुरस वाढली

Web Title: Rcb vs pbks virat kohli scored 500 9th time in ipl 2026 record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Royal Challengers Bengaluru
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे
1

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.