Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : ‘किंग’ कोहलीचा जलवा कायम! खुणावतोय IPL मधील ‘विराट’ पराक्रम; मोडणार ‘हा’ विक्रम.. 

आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४१ सामने खेळवण्यात आले आहेत. या दरम्यान अनेक सामन्यात वेगवेगळे विक्रम झालेले बघायला मिळाले आहे. आता आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील मोठा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 24, 2025 | 10:37 AM
IPL 2025: 'King' Kohli's brilliance continues! 'Virat's' prowess in IPL is showing; 'This' record will be broken..

IPL 2025: 'King' Kohli's brilliance continues! 'Virat's' prowess in IPL is showing; 'This' record will be broken..

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs SRH : आयपीएल २०२५ चा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आतापर्यंत ४१ सामने खेळवण्यात आले आहेत. या दरम्यान अनेक सामन्यात खेळाडू वेगवेगळे विक्रम रचत आहेत. नुकताच रोहित शर्माने काल झालेल्या हैद्राबादविरुद्ध षटकार लगावत मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. अशातच  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू धडाकेबाज फलंदाज आणि रन मशीन विराट कोहली देखील चांगलाच फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीने या हंगामात आतापर्यंत चार अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याने सलामीवीर म्हणून संघाला चांगली सुरुवात देखील करून दिली आहे. यामुळेच आरसीबी संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे या हंगामात आरसीबीला  प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चार संघांपैकी एक मानले जाता आहे. संघाने ८ पैकी ५ सामने जिंकले असून १० गुणांसह, आरसीबी गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म बघता, तो येत्या काळात अनेक विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. तो एक विक्रम मोडीत काढण्याच्या उंबरठ्यावर आहे. माजी अनुभवी सलामीवीर शिखर धवनचा आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा महान विक्रम तो मोडू शकतो.

हेही वाचा : MI vs SRH : Rohit Sharma चा मुंबई इंडियन्ससाठी ‘बिग शो’, रचला मोठा इतिहास; किरॉन पोलार्डलाही पछाडले..

‘हा’ विक्रम काढणार मोडीत..

शिखर धवनने आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळताना महत्वाचे योगदान दिले आहे. शिखर धवनने आयपीएलमध्ये २२२ सामन्यांपैकी २२१ डावात ७६८ चौकार लगावले आहे. विराट कोहलीने २६० सामन्यांपैकी २५२ डावात ७३२ चौकार मारले आहेत. शिखर धवनचा हा महान विक्रम मोडण्यापासून विराट कोहली केवळ ३७ चौकारच दूर आहे. विराट कोहलीनंतर  तिसऱ्या क्रमांकावर  डेव्हिड वॉर्नरचे नाव आहे. त्याने आयपीएलमध्ये ६६३ चौकार लगावले आहेत. यासाठी त्याने १८४ सामन्यांपैकी १८४ डावांचा सामना केला. डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या या   हंगामात खेळत नाही.

हेही वाचा : ‘धर्माच्या नावाखाली..’, Pahalgam Terrorist Attack वर Mohammad Siraj चा संताप, Amit Shah यांना केली ‘ही’ मागणी..

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज

  • शिखर धवन – ७६८
  • विराट कोहली – ७३२
  • डेव्हिड वॉर्नर – ६६३
  • रोहित शर्मा – ६१७
  • सुरेश रैना – ५०६

विराट कोहलीचा फॉर्म जोरात

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा चौकार मारण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत ६१७ चौकार मारले आहेत. यासाठी त्याने २६० डाव खेळले आहेत. तर पाचव्या क्रमांकावर सुरेश रैना आहे, ज्याने ५०६ चौकार मारले आहेत. यासाठी त्याने १९३ सामन्यांच्या १७९ डाव घेतले आहेत. या हंगामात विराट कोहलीचा फॉर्मबद्दल सांगायचे झाले तर तो ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत आहे. विराट कोहली ८ सामन्यांच्या ८ डावात ३२२ धावा करून आठव्या क्रमांकावर विराजमान आहे.

  •  सरासरी ६४.४०
  • स्ट्राईक रेट १४०.००
  • अर्धशतक ४
  • चौकार २७
  • षटकार  ११

Web Title: Rcb vs srh virat kohli has a chance to create big history in ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
2

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
3

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
4

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.