'धर्माच्या नावाखाली..', Pahalgam Terrorist Attack वर Mohammad Siraj चा संताप(फोटो-सोशल मीडिया)
Pahalgam Terrorist Attack : देशात आयपीएल २०२५ चा थरार रंगला आहे तर दुसरीकडे देशाला हादरा बसणारी घटना घडली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप लोकांचा दुर्दैवी बळी गेला आहे. तसेच २० हून अधिक लोक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. एकीकडे भारत सरकार दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असताना, दुसरीकडे देशातील जनतेचा राग आता क्रिकेटच्या मैदानावर जाऊन पोहोचला आहे. या दरम्यान, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि इरफान पठाण सारख्या खेळाडूंनी दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याबद्दल दुःख व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे.
आता या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे नाव जोडले गेले आहे. त्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवाला आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्याने केली आहे. या दरम्यान, मोहम्मद शमीने गृहमंत्री अमित शहा यांना श्रद्धांजली वाहतानाचा फोटो शेअर केला असून त्याने या घटनेने खूप दुःखी असल्याचे म्हटले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर दु:ख व्यक्त केले आहे. त्याबाबत त्याने एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यादरम्यान, त्याने भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना श्रद्धांजली वाहतानाचा एक फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिले आहे की, पहलगाममधील भयानक आणि दुःखद दहशतवादी हल्ल्याबद्दल त्याने नुकतेच वाचले. ही एक अतिशय वेदनादायक आणि धक्कादायक घटना आहे. धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांना मारणे हे खूप वाईट आणि अमानवी असे कृत्य आहे. कोणतेही कारण किंवा विचार अशा क्रूर कृत्याचे समर्थन करू शकत नाही. अशी पोस्ट सिराजने केली आहे.
पुढे, त्याने लिहिले की, ही कसली लढाई आहे?, जिथे मानवी जीवनाला काहीच किंमत नाही. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे ते ज्या खोल दुःख आणि धक्क्यातून जात आहेत, त्याबद्दल विचार करून मन दुखी होते. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्या कुटुंबांना या कठीण काळातून बाहेर पडण्याची शक्ती मिळो. त्यांच्या नुकसानाबद्दल आम्हाला खूप वाईट वाटत आहे. मला आशा आहे की, ही हिंसाचार लवकरच थांबेल आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळेल, जेणेकरून ते कधीही कोणालाही यापुढे नुकसान पोहोचवू शकणार नाहीत.