Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral

रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. शतकानंतर त्याची पत्नी रितिका भावुक झाली आणि त्याने मैदानातूनच तिला फ्लाइंग किस दिले. व्हिडिओ व्हायरल झाला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 20, 2026 | 01:37 PM
शतक केल्यानंतर रोहित शर्माची बायको भावूक (फोटो सौजन्य - X.com)

शतक केल्यानंतर रोहित शर्माची बायको भावूक (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • रोहित शर्माने लॉर्ड्सवर १३८ धावा करत केला नवा रेकॉर्ड
  • शतक झळवल्यावर पत्नी रितिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू 
  • मैदानातूनच रोहित झाला रोमँटिक दिले फ्लाईंग किस 
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला २७ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे, टी-२० मालिकेनंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही १-२ ने गमावली. मात्र, लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने शानदार १३८ धावा केल्या. आपल्या शतकादरम्यान रोहितने १७ चौकार आणि पाच षटकार मारले.

तिसरा सामना हा भारतीय संघाने हरला असला तरीही शेवटपर्यंत झुंज दिली आणि त्यातही रोहित शर्माची कामगिरी ही कायम अविस्मरणीय राहील अशीच होती. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा निवृत्ती घेणार अशा वावड्या उठल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवर रोहितने खेळलेली ही १३८ धावांची खेळी अत्यंत महत्त्वाची ठरली. यावेळी रोहितच्या पत्नीनेदेखील लक्ष वेधून घेतले. 

आई शप्पथ! रोहित शर्माने जगाची तोंडं केली बंद, Lord’s वर शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू

रोहितच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू

This is the first time ig Rohit Sharma has given flying kiss to Ritika while batting. This innings was so emotional for him 😭❤️ pic.twitter.com/UG0HO4Eb0F — Kusha Sharma  (@Kushacritic) July 19, 2026

रोहित शर्माने आदिल रशीदच्या गोलंदाजीवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याची पत्नी रितिकाही तिथे उपस्थित होती. जेव्हा रोहितने आपले शतक पूर्ण केले, तेव्हा संपूर्ण स्टेडियम उभे राहिले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. रितिकाही तिथे उपस्थित होती. दरम्यान यावेळी रोहितची पत्नी खूपच भावूक झाली होती आणि रितिका आपले अश्रू पुसताना दिसली. तिचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रोहितच्या फॉर्मबाबत सगळीकडे चर्चा होत होती आणि त्यामुळे त्याची ही खेळी सर्वांसाठीच भावूक होती. 

रोहित शर्माचे फ्लाइंग किस

शतक पूर्ण केल्यानंतर रितिकाच्या डोळ्यात अश्रू आले होते, म्हणून रोहितने तिला मैदानाच्या मध्यातून फ्लाइंग किस दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, रोहित शर्माने आपले शतक कोणत्याही विशेष पद्धतीने साजरे केले नाही. त्याच्या शतकाच्या वेळी, भारतीय संघ लक्ष्यापासून खूप दूर होता. यामुळेच रोहितने आपली हॅट-ऑफसुद्धा केली नाही.

Rohit Sharma Record: निवृत्ती ते काय असतं? क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडत Hitman ठरला नंबर 1, शतकही केले पूर्ण

भारतीय संघासमोर ३८८ धावांचे लक्ष्य होते

रोहितची संस्मरणीय खेळीसुद्धा भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. इंग्लंडच्या ३८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ७ गडी गमावून केवळ ३६० धावाच करता आल्या. रोहितशिवाय, शुभमन गिलने भारतासाठी ७७ धावा केल्या, तर कोहलीने ६० चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. या सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाने मालिकाही गमावली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला, तर दुसरा आणि तिसरा सामना इंग्लंडने जिंकला.

Web Title: Rohit sharma made history at lords blew flying kiss to wife ritika sajdeh after scoring century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • IND Vs ENG
  • Ritika Sajdeh
  • Rohit Sharma

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.