Rohit Sharma has been suffering from 'that' pain for the last 5 years! The 'Hitman' will have to undergo a major surgery after IPL 2025.
IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत ६३ सामने खेळवण्यात आले आहते. काल झालेल्या ६३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात रोहित शर्मा देखील खेळला. पण त्याला आपली छाप पडता आली नाही. दरम्यान, त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी खेळताना आणि नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान, या अनुभवी खेळाडूबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. रोहित शर्माला शारीरिक समस्या जाणवत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे समजते.
अशी माहिती समोर आली आहे की, रोहित शर्मा आयपीएल २०२५ नंतर ऑपरेशन करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा गेल्या पाच वर्षांपासून एका समस्येने त्रस्त आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा त्रास होते असल्याची बातमी समोर आली आहे. असे बोलले जात की, शस्त्रक्रियेद्वारेच यावर योग्य उपचार केले जाऊ शकतात.
माहितीसाठी, रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे. पण दोन वर्षांनी होणाऱ्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात तो टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची त्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मावर शस्त्रक्रिया करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे मानले जात आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी खेळवण्यात येत आहे.
आयपीएल २०२५ नंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जिथे भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा खेळताना दिसणार नाही. अशा परिस्थितीत, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मानले जात आहे. मोठ्या स्पर्धेमुळे रोहित शर्माला काही काळ शस्त्रक्रिया करणे जमले नाही. आता आयपीएलनंतर रोहित शर्माकडे आरोग्याची काळजी घेण्यासाठी भरपूर वेळ असणार आहे.
हेही वाचा : क्रीडा जगतात खळबळ! श्रीलंकेच्या ‘या’ क्रिकेटपटूला अटक, गंभीर आरोपामुळे केली कारवाई…
२०१६ च्या सुरुवातीला रोहित शर्माच्या क्वाड्स टेंडनवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यातून सावरण्यासाठी रोहित शर्माला एकूण तीन महिन्यांचा कालावधी लागला होता. त्याच वेळी, हॅमस्ट्रिंग शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी ५ ते ६ महिने लागू शकतात. सध्या रोहित शर्माकडे या शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी बराच वेळ असणार आहे.