वैभव सूर्यवंशी आणि राहुल द्रविड(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत ६३ सामने खेळवण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या ६२ सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुरप किंग्सला पराभूत करून आयपीएल २०२५ मधील आपला शेवट विजयाने केला. राजस्थान रॉयल्स प्लेऑफमधूनही बाहेर पडला आहे. आयपीएल २०२५ संपूर्ण हंगामात राजस्थान संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. यामुळेच या संघाला प्लेऑफ देखील गाठता आले नाही. या स्पर्धेत राजस्थानचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी चांगलाच चर्चेत राहिला आहे. त्याच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकायला येत असतात. शेवटच्या सामन्यानंतर देखील त्याची अशीच एक गोष्ट प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितली.
राहुल द्रविडने सांगितले की, चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या शेवटच्या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी याने त्याचा अनुभव द्रविडसोबत शेअर केला. आयपीएल २०२५ च्या हंगामात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. पुढील वर्षापासून तो राजस्थानसाठी सर्वात मजबूत दुवा म्हणून उदयास येण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहेत.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत १०० धावा करून सर्व क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले. त्यानंतर त्याला अनेक फोन आणि मेसेज आल्याचे आरआर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले आहे. द्रविडने त्या तरुण खेळाडूला याबद्दल विचारणा केली. तेव्हा उत्तर देताना वैभवने हसत हसत प्रशिक्षकाला सांगितले की गुजरातविरुद्धच्या सामन्यात शतक केल्यानंतर त्याच्या फोनवर सुमारे ५०० मिस्ड कॉल आले होते. पण या दरम्यान तो कोणाशी देखील बोलला नाही आणि त्याने त्याचा मोबाईल फोन बंद करून ठेवला.
वैभव सूर्यवंशी म्हणाला की, त्याला जास्त लोकांशी बोलायला आवडत नाही. त्याला फक्त त्याच्या कुटुंबासोबत आणि काही जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवायला आवडतं. यामागील हेतु म्हणजे त्यांचे लक्ष दुसरीकडे भटकू नये, विचलित होऊ नये. आयपीएल २०२५ पूर्वी, वैभव सूर्यवंशीला खूप कमी लोक ओळखत होते. पण या हंगामात या तरुण फलंदाजाच्या स्फोटक खेळीनंतर संपूर्ण जगाने त्याची दखल घेतली आहे.
हेही वाचा : क्रीडा जगतात खळबळ! श्रीलंकेच्या ‘या’ क्रिकेटपटूला अटक, गंभीर आरोपामुळे केली कारवाई…
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आपल्या फलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा खेळाडू आता भारतातील इतर अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणा ठरत आहे. वैभवने चालू हंगामात एकूण ७ आयपीएल सामने खेळले आहेत. या काळात त्याने ३६ च्या सरासरीने २५२ धावा केल्या आहेत.