रमिथ रामबुकवेला(फोटो-सोशल मीडिया)
Sri Lankan cricketer arrested : क्रीडा जगतात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रमिथ रामबुकवेला याला बुधवारी अटक करण्यात आली आहे. रमिथ रामबुकवेलाला त्यांच्या राजकारणी वडिलांशी संबंधित असणाऱ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी आयोगाकडून अटक करण्यात आली आहे.
लाचखोरी किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाने रामित रामबुकवेला बुधवारी सकाळी त्यांच्यासमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. लाचलुचपत आयोगासमोर त्याचे म्हणणे नोंदवल्यानंतर त्याला अटक करण्यात आलीया आहे. नंतर कोलंबोच्या मुख्य दंडाधिकारी न्यायालयाकडून त्याला ३ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोलंबोचे मुख्य दंडाधिकारी तनुजा लकमाली यांनी मंगळवारी रामबुकवेला यांचे वडील, राजपक्षे यांच्या प्रशासनातील माजी शक्तिशाली असणारे मंत्री केहेलिया रामबुकवेला यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात संशयित म्हणून नाव घेण्यास परवानगी दिली आहे. आयोगाने यापूर्वी अटक केलेल्या केहेलियाला यांना देखील ३ जूनपर्यंत रिमांडवर पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असून २०२४ मध्ये त्यांच्याच सरकारमध्ये आरोग्यमंत्री असताना निकृष्ट दर्जाची औषधे खरेदी करण्यासाठी भारतीय क्रेडिट लाइनचा गैरवापर केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. यशस्वी शालेय क्रिकेट कारकिर्दीनंतर, रामितने २०१३ आणि २०१८ मध्ये अनुक्रमे न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
श्रीलंकेचे पोदुजाना पेरामुना खासदार नमल राजपक्षे, माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे पुत्र. त्यांच्यावर ७ कोटी श्रीलंकेच्या रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्रीलंकेतील रग्बीच्या विकासासाठी भारतस्थित असणाऱ्या क्रिश हॉटेल्सने ही रक्कम दान केली. असा आरोप करण्यात याला आहे की, निधीचा वापर नियुक्त केलेल्या उद्देशांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी केला गेला आहे. ज्यामुळे सरकार आणि क्रीडा संघटनांमधील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
हेही वाचा : MI Vs DC: दिल्ली कॅपिटल्सचे घामटे निघाले, मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सचा कहर; Playoff मध्ये दिमाखात एंट्री
नमल राजपक्षे स्वतः एक माजी राष्ट्रीय रग्बी खेळाडू राहिले आहेत. श्रीलंकेत खेळांच्या, विशेषतः रग्बीच्या प्रचाराशी त्यांनी दीर्घकाळ काम केलेले आहे. या प्रकरणाची पूर्व-चाचणी सुनावणी २७ जून रोजी होणार आहे, ज्यामध्ये न्यायालय या प्रकरणात पुढील आरोपपत्र दाखल करायचे की नाही याबाबत निर्णय देईल.