Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma: ‘एक आखिरी बार…’! रोहित शर्माच्या पोस्टने वाढवली चाहत्यांची चिंता; निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा जोर

तिसरा सामना टीम इंडियाने ९ विकेट्सने जिंकला असला तरी, मालिकेत भारताला १-२ ने पराभव पत्करावा लागला. या अंतिम सामन्यात रोहित शर्मा(नाबाद १२१) आणि विराट कोहली (नाबाद ७४) यांच्या बॅटमधून दमदार खेळी पाहायला मिळाली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 26, 2025 | 07:28 PM
रोहित शर्माच्या पोस्टने वाढवली चाहत्यांची चिंता (Photo Credit- X)

रोहित शर्माच्या पोस्टने वाढवली चाहत्यांची चिंता (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • सिडनी वनडेत रोहित-विराटचा धमाका
  • हिटमॅनने ठोकले नाबाद १२१ धावा
  • पण परतीपूर्वीच्या पोस्टमुळे एकदिवसीय कारकिर्दीबाबत संभ्रम

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात झालेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच (२५ ऑक्टोबर) सिडनी येथे संपली. तिसरा सामना टीम इंडियाने ९ विकेट्सने जिंकला असला तरी, मालिकेत भारताला १-२ ने पराभव पत्करावा लागला. या अंतिम सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) (नाबाद १२१) आणि विराट कोहली (नाबाद ७४) यांच्या बॅटमधून दमदार खेळी पाहायला मिळाली. या मालिकेत रोहितने एकूण २०२ धावा केल्या. मात्र, मालिका संपल्यानंतर मायदेशी परतताना रोहित शर्माने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

पोस्टमध्ये काय लिहिले?

या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर झाला तेव्हा रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले होते. तेव्हापासूनच रोहित एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सिडनी वनडेत दमदार शतक ठोकून रोहितने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

One last time, signing off from Sydney 👊 pic.twitter.com/Tp4ILDfqJm — Rohit Sharma (@ImRo45) October 26, 2025

IND vs AUS : रोहित-विराटने धुमाकुळ घातल्यानंतर गंभीर आणि आगरकर क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर! सोशल मिडियावर केलं ट्रोल

मात्र, आता वनडे मालिका संपवून सिडनीहून देशात परतताना रोहितने विमानतळावरील आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले आहे: “सिडनीला शेवटचा निरोप”. रोहितच्या या भावनिक पोस्टने त्याच्या भविष्यातील एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल संशय निर्माण केला आहे.

‘मला नेहमीच इथे खेळायला आवडले’

सिडनी वनडेमध्ये नाबाद १२१ धावांची शानदार खेळी केल्यानंतर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियातील चाहत्यांचे आभार मानले होते. त्यावेळी तो म्हणाला होता, “मला खात्री नाही की आम्ही (क्रिकेटर म्हणून) येथे पुन्हा परत येऊ की नाही, पण मला येथे खेळण्याचा खूप आनंद मिळाला. गेल्या १५ वर्षांत जे काही झाले ते विसरून जा, मला नेहमीच येथे खेळायला आवडले आहे.” दरम्यान, टीम इंडियाची पुढील एकदिवसीय मालिका नोव्हेंबरच्या अखेरीस आहे आणि या मालिकेत रोहित शर्मा खेळण्याची पूर्ण शक्यता आहे.

Rohit Sharma Milestone: धोनीचा विक्रम मोडीत ‘हिटमॅन’ रोहित शर्मा निघाला पुढे! ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ अवॉर्ड जिंकून केला मोठा पराक्रम

Web Title: Rohit sharmas post increases fans concerns retirement talks intensify again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 07:28 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Rohit Sharma
  • Sports
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND W vs BAN W : भारताचा संघ सेमीफायनलआधी लढणार बांग्लादेशशी! हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करणार
1

IND W vs BAN W : भारताचा संघ सेमीफायनलआधी लढणार बांग्लादेशशी! हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करणार

Ranji Trophy 2025-26 : करुण नायरचं 25 वे फर्स्ट क्लास शतक तर रहाणेची धुव्वादार खेळी! टीम इंडियातून वगळल्यानंतर केला कहर
2

Ranji Trophy 2025-26 : करुण नायरचं 25 वे फर्स्ट क्लास शतक तर रहाणेची धुव्वादार खेळी! टीम इंडियातून वगळल्यानंतर केला कहर

India W vs Australia W Semi final : भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी! ऑस्ट्रेलियाची मुख्य खेळाडू खेळण्याची शक्यता कमी
3

India W vs Australia W Semi final : भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी! ऑस्ट्रेलियाची मुख्य खेळाडू खेळण्याची शक्यता कमी

IND vs AUS : रोहित-विराटने धुमाकुळ घातल्यानंतर गंभीर आणि आगरकर क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर! सोशल मिडियावर केलं ट्रोल
4

IND vs AUS : रोहित-विराटने धुमाकुळ घातल्यानंतर गंभीर आणि आगरकर क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर! सोशल मिडियावर केलं ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.