धोनीचा विक्रम मोडीत 'हिटमॅन' रोहित शर्मा निघाला पुढे! (Photo Credit- X)
IND vs AUS 3rd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने (Team India) सिडनी येथे झालेला तिसरा सामना ९ गडी राखून जिंकला आणि मान राखण्यात यश मिळवले. या निर्णायक सामन्यात टीम इंडियाचे दोन सुपरस्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या बॅटचा जलवा दिसला. रोहित शर्माने या सामन्यात १२१ धावांची नाबाद शतकी खेळी केली.
या संपूर्ण मालिकेत रोहितच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतक निघाले. त्याने १०१ च्या सरासरीने एकूण २०२ धावा केल्या. या शानदार कामगिरीसाठी रोहितला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, आणि याच पुरस्कारामुळे त्याने एमएस धोनीचा एक मोठा विक्रम मोडला.
2️⃣0️⃣2️⃣ runs 👏
2️⃣1️⃣ fours 👌
5️⃣ sixes 👍
A splendid century 💯 For his superb batting, Rohit Sharma is adjudged the Player of the Series! 🔝 Scorecard ▶ https://t.co/omEdJjRmqN#TeamIndia | #3rdODI | #AUSvIND | @ImRo45 pic.twitter.com/Bq2hS8IHLS — BCCI (@BCCI) October 25, 2025
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक लक्ष रोहित शर्माच्या कामगिरीवर होते. मुंबईतून दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्याने खूप तयारी केली होती. पहिल्या वनडेत रोहित शांत होता, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत त्याचा जुना आणि आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. रोहित शर्माला मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार देण्यात आला, तेव्हा तो सर्वाधिक वयात हा किताब जिंकणारा भारतीय खेळाडू बनला. हा विक्रम यापूर्वी एमएस धोनीच्या नावावर होता, ज्याने ३७ वर्षे १९४ दिवसांच्या वयात हा पुरस्कार जिंकला होता.
भारतासाठी सर्वात जास्त वयात ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ अवॉर्ड जिंकणारे खेळाडू:
| खेळाडूचे नाव | वय (पुरस्काराच्या वेळी) |
| रोहित शर्मा | ३८ वर्षे १७८ दिवस |
| एमएस धोनी | ३७ वर्षे १९४ दिवस |
| सुनील गावस्कर | ३७ वर्षे १९० दिवस |
सिडनी वनडे सामन्यात रोहित शर्माला त्याच्या १२१ धावांच्या शानदार खेळीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारही देण्यात आला. यासोबतच, सर्वात जास्त वयात ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब जिंकणारा भारतीय खेळाडू बनण्याचा मानही रोहितने मिळवला आहे. यापूर्वी, हा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर होता, ज्यांनी ३८ वर्षे ११३ दिवसांच्या वयात ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार जिंकला होता.
IND VS AUS: सिडनीत Rohit Sharma चे ‘डबल’ शतक! ODI क्रिकेटमध्ये गाठला ‘हा’ खास टप्पा






