Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूड! लागोपाठ यशस्वीने मारले 3 चौकार, मोहम्मद शामीचा राग अनावर अन् पुढच्याच बॉलवर…

२२ एप्रिलच्या रात्री लखनौ सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. मोहम्मद शमीने एकाच षटकातील सलग तीन चेंडूंवर यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेलला बाद करून LSG ची सुरुवात खराब केली.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 22, 2026 | 09:35 PM
मोहम्मद शामीचा जलवा (फोटो सौजन्य - Instagram)

मोहम्मद शामीचा जलवा (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • मोहम्मद शमीचा धडाका 
  • एकाच ओव्हरमध्ये दोघांना धाडले माघारी 
  • ३ चौकार खाल्ल्यानंतर घेतला बदला 
IPL 2026 चे सामने सध्या रंगतदार होत आहेत आणि आज अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जाएंट्स विरूद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना रंगला आहे. राजस्थान रॉयल्स सुरूवातीला टेबल पॉईंट्समध्ये टॉपवर होते मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये हा संघ मागे पडला आहे आणि आजही धावांचा पाऊस पाडू शकला नाहीये. दरम्यान सुरूवातीच्या ओव्हरमध्ये तर यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद शमीच्या बॉलिंग आणि बॅटिंगचा सामना अधिक रंगलेला दिसला. 

सलग तीन चेंडूंवर चौकार दिल्यानंतर कोणत्याही गोलंदाजासाठी पुनरागमन करणे कठीण असते. विशेषतः टी-२० क्रिकेट खेळताना, हे अशक्यच मानले जाऊ शकते. पण मोहम्मद शमीच्या शब्दकोशात अशक्य असे काहीच नाही. २२ एप्रिलच्या रात्री, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीने सलग तीन चौकार दिले, पण चौथ्या चेंडूवर त्याने यशस्वी जैस्वालवर सूड घेतला.

LSG Vs RR Live: ऋषभ पंतने वाढवल्या राजस्थानच्या अडचणी; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

यशस्वीला धाडले माघारी 

☝🏻Yashasvi Jaiswal
☝🏻Dhruv Jurel
Mohammad Shami gets 2 in 2 to put Lucknow Super Giants on top.#TATAIPL 2026 | #LSGvRR | LIVE NOW 👉 https://t.co/PNPfcFt2z9 pic.twitter.com/zMbuYnY025 — Star Sports (@StarSportsIndia) April 22, 2026

यशस्वी जयस्वालने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पॉइंट आणि डीप थर्डला, तर चौथ्या चेंडूवर मिड-ऑफवरून चौकार मारला. तीन चौकार दिल्यानंतर संतापलेल्या मोहम्मद शमीने चौथा चेंडू टाकला. १४१ किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या चेंडूवर जैस्वालने हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या बाजूने वेगाने गेला आणि त्याच्या ग्लोव्हला लागला. सुरुवातीला, त्याने चेंडू मारला की नाही हे स्पष्ट नव्हते, पण ग्लोव्ह अजूनही चेंडूवर होता. पंतने उंच उडी मारून आपल्या उजव्या दंडावर झेल घेतला आणि यशस्वी जयस्वालचा १२ चेंडूंतील २२ धावांचा डाव संपवला. यशस्वीने त्या २२ धावांपैकी १६ धावा चौकारांनी केल्या होत्या.

पुढच्याच चेंडूवर जुरेलही बाद

३२ धावांवर राजस्थानची ही पहिली विकेट होती. संघ या धक्क्यातून सावरण्याआधीच, नवा फलंदाज ध्रुव जुरलही पुढच्याच चेंडूवर बाद झाला. १३६ किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या अप्रतिम लेंथ बॉलवर जुरलची बॅट पूर्णपणे उघडी होती आणि यष्टीमागे पंतने कोणतीही चूक केली नाही. जुरलला आपले खातेही उघडता आले नाही. अशाप्रकारे, पहिल्या चार चेंडूंमध्ये १२ धावा दिल्यानंतर, शमीने शेवटच्या दोन चेंडूंमध्ये दोन बळी घेत राजस्थानची सुरुवात खराब केली. दरम्यान गेल्या २ सामन्यांमध्ये राजस्थान रॉयलचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी कोणतीही कमाल दाखवू शकलेला नाही. मागच्या सामन्यादरम्यान तर वैभवचा रडताना व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. आजही वैभव केवळ ८ धावांवर कॅचआऊट झाला. 

LSG vs RR Head to Head: लखनौच्या इकाना मैदानावर आज ‘नवाब’ की ‘राॅयल’ कोण ठरणार वरचढ? पाहा ‘हेड टू हेड’ रेकाॅर्ड

Web Title: Rr vs lsg mohammad shami takes yashasvi jaiswal wicket after 3 consecutive fours revenge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Mohammed Shami
  • RR vs LSG

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.