Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohammed Shami: न्यूझीलंड दौऱ्यात संधी नाही, आता बंगालच्या रणजी संघातूनही मोहम्मद शामी OUT; नेमकं कारण काय?

Mohammed Shami dropped From Bengal Ranji Team: रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात प्रभावी कामगिरीनंतरही मोहम्मद शामीला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. आता त्याला बंगालच्या अंतिम ११ खेळाडूंमधून वगळण्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 18, 2026 | 05:30 PM
Mohammed Shami

Mohammed Shami

Follow Us
Follow Us:
  • मोहम्मद शामीला दुहेरी धक्का
  • बंगालच्या संघातूनही शमीचा पत्ता कट
  • कारण अद्याप अस्पष्ट
Mohammed Shami: रणजी ट्रॉफीच्या २०२६-२७ च्या पहिल्या सामन्यात मोहम्मद शामीने बंगालसाठी उत्कृष्ट गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतले. यानंतर, भारतीय संघात त्याच्या निवडीबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या एकदिवसीय किंवा कसोटी संघात त्याचा समावेश करण्यात आला नाही. आता, मोहम्मद शामीला बंगालच्या अंतिम ११ खेळाडूंमधूनही वगळण्यात आले आहे. सर्व्हिसेसविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. मात्र, त्याच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप उघड करण्यात आलेले नाही. (Mohammed Shami dropped From Bengal ranji Team)

IND vs NZ: वेस्ट इंडिज सीरिजनंतर टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार; T20, वनडे अन् कसोटीचा थरार रंगणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

न्यूझीलंड दौऱ्यावर शामीला डच्चू

भुवनेश्वर कुमारच्या टी२० संघात पुनरागमनानंतर, मोहम्मद शमीच्या कमबॅकबद्दलही जोरदार चर्चा सुरू होती. वृत्तानुसार, न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या एकदिवसीय किंवा कसोटी संघात शामीला सामील केले जाईल, अशी माहिती होती. मात्र, शामीला दोन्हीही संघांमधून वगळण्यात आले आहे.

बंगालच्या संघातूनही बाहेर

मोहम्मद शमीने २०२६-२७ रणजी ट्रॉफीमध्ये बंगालसाठी आपला पहिला सामना खेळला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतले. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात १ विकेट घेतला. मात्र, पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करुनही बंगाल आणि सर्व्हिसेस यांच्यातील रणजी ट्रॉफी एलिट सामन्यात मोहम्मद शामीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले नाही. शामीने स्वतःहून या सामन्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला की संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती दिली. याबद्दलती अधिकृत माहिती अद्याप सांगण्यात आलेली नाही.

मोहम्मद शमीने आतापर्यंत १०१ प्रथम-श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने ३८९ विकेट्स घेतले आहेत. या कालावधीत शमीने १५ वेळा ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स आणि दोन वेळा १० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतले आहेत.

मुकेश कुमार- आकाश दीपदेखील बाहेर

सर्व्हिसेसविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यातून केवळ मोहम्मद शमीलाच वगळण्यात आले नाही, तर मुकेश कुमार आणि आकाश दीप यांनाही वगळण्यात आले आहे. हे दोघेही न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेसाठीच्या भारत ‘अ’ संघाचा भाग आहेत. त्यामुळे हे दोघेही रणजी सामन्यात खेळताना दिसणार नाही. भारत अ संघ येत्या काही दिवसांत न्यूझीलंडला रवाना होईल.

सर्व्हिसेस विरुद्ध बंगालचा प्लेइंग ११: अभिमन्यू ईश्वरन (क), अंकुर पॉल, सुदीप कुमार घारामी, सुदीप चॅटर्जी, शाहबाज अहमद, सुमंत गुप्ता, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), प्रदीप्ता प्रामानिक, आमिर घनी, मोहम्मद कैफ, सूरज सिंधू जैस्वाल.

Ishan Kishan: एका खेळीत विश्वविक्रम! ईशान किशनचा मैदानात धुमाकूळ; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडत T20I मध्ये रचला इतिहास

Web Title: Mohammed shami dropped bengal ranji team new zealand tour pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Mohammed Shami
  • ranji trophy 2026
  • West bengal

संबंधित बातम्या

West Bengal वर दुर्गा माता कोपली…! रविवार ठरला ‘अपघातवार’, 5 जणांचा मृत्यू
1

West Bengal वर दुर्गा माता कोपली…! रविवार ठरला ‘अपघातवार’, 5 जणांचा मृत्यू

न्यूझीलंड मालिकेआधी रवींद्र जडेजाची गर्जना! रणजीत शतक ठोकत गोलंदाजीतही दाखवला दम, टीम इंडियाची चिंता मिटणार?
2

न्यूझीलंड मालिकेआधी रवींद्र जडेजाची गर्जना! रणजीत शतक ठोकत गोलंदाजीतही दाखवला दम, टीम इंडियाची चिंता मिटणार?

काय भावा टेंशन वाढवलंस की! न्यूझीलंड दौऱ्याआधी KL Rahul ने वाढवली भारताची चिंता, खराब फॉर्म अन्…
3

काय भावा टेंशन वाढवलंस की! न्यूझीलंड दौऱ्याआधी KL Rahul ने वाढवली भारताची चिंता, खराब फॉर्म अन्…

Football चाहत्यांनो ‘चलो कोलकाता’; चक्क रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाच्या दिग्गजांना भिडताना पाहण्याची मिळणार संधी
4

Football चाहत्यांनो ‘चलो कोलकाता’; चक्क रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाच्या दिग्गजांना भिडताना पाहण्याची मिळणार संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.